पल्लेकेल: येथे सुरू असलेल्या श्रीलंका आणि भारत विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली ४२ धावा करून बाद झाला. विराटने ८४ चेंडूत ४२ धावा केल्या. भारताला या डावात ५वा झटका बसला आहे.
७९ व्या षटकात संदकनच्या गोलंदाजीवर कव्हर ड्राइव्ह मारण्याच्या मोहात विराट स्लिपमध्ये करुणारत्नेला सोपा झेल देऊन बाद झाला. कोहलीने आणखीन ८ धावा केल्या असत्या तर हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील १५वे अर्धशतक ठरले असते.
आता मैदानात भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू म्हणजेच रविचंद्रन अश्विन खेळत आहे तर त्याबरोबर वृद्धिमान साहा फलंदाजी करत आहे . भारताच्या सलामीवीरांनी चांगली कामगिरी केली होती तरी भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांना त्याचा फायदा उचलता आला नाही. आता भारताची स्थिती ३०६ धावांवर ५ बाद अशी आहे.