भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी टी20 विश्वचषक 2020च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 8मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय संघ विजेतेपदासाठी ऑस्ट्रेलिया संघाबरोबर होणार आहे.
ऑस्ट्रेलिया संघ 7 पैकी 6व्यांदा टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत खेळत अाहे. यापैकी 4वेळा त्यांनी विजेतेपद जिंकले आहे. दुसऱ्या बाजूला भारतीय संघ पहिल्यांदाच टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत गेला आहे.
यापुर्वी भारतीय संघ 50 षटकांच्या महिलांच्या विश्वचषकात अंतिम फेरीत इंग्लंड संघाकडून पराभूत झाला होता. तो भारतीय पुरुष संघाचा कर्णधार विराट कोहलीने एक दिवस आधी ट्विट केला होता. तसेच मिताली राजच्या संघाला शुभेच्छा दिल्या होत्या.
त्यानंतर भारतीय संघ याचवर्षी 9 फेब्रुवारी रोजी 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम फेरीत बांगलादेशकडून पराभूत झाला. या सामन्यापुर्वी विराटने संघाला शुभेच्छा देणारा ट्विट केला होता.
पृथ्वीच्या नेतृत्त्वाखाली 2018मध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत भारताने 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकाच जिंकला होता. तेव्हा विराटने संघाला शुभेच्छा दिल्या नव्हत्या. परंतु उपांत्यफेरीत संघ जिंकल्यानंतर कौतूक केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
–निवड समितीच्या नवीन अध्यक्षाविषयी हे माहित आहे का? घ्या जाणून…
–सेमीफायनलप्रमाणे फायनलही रद्द झाली तर हा संघ जिंकणार विश्वचषक
–वर्ल्डकपची फायनल आणि हरमनप्रीत कौरचा बर्थ डे – घडणार मोठा इतिहास