रांची । भारतीय संघाने रांची येथे झालेला पहिला टी२० सामना ९ विकेट्सने जिंकला. जरी असे असले तरी कर्णधार विराटने याबद्दल नाराजगी व्यक्त केली आहे.
भारताने ऑस्ट्रेलिया संघाला १८.४ षटकांत ११८ धावांवर थोपवल्यानंतर डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे भारतासमोर ६ षटकांत ४८ धावांचे लक्ष ठेवण्यात आले होते. कोहलीच्या मते हे लक्ष अपेक्षेपेक्षा जास्त होते.
“आम्हाला खरोखऱ डकवर्थ लुईस समजत नाही. आम्ही त्यांना ११८वर थांबवल्याबर वाटले होते की ६ षटकांत ४० धावांचे लक्ष असेल. परंतु ४८ हे खूप मोठं लक्ष होत. “
“नाणेफेक जिंकून आम्हीं गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा एक चांगला निर्णय होता. आमच्या गोलंदाजांनी लवकर यश मिळवून दिले. परंतु जे लक्ष देण्यात आले होते ते नक्कीच अवघड होते. “
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा टी२० सामना उद्या गुवाहाटी शहरात होणार आहे. भारतीय कर्णधार या सामन्यातही विजय मिळवण्यासाठी उत्सुक असणार यात शंका नाही.