धरमशाला। आजपासून(15 सप्टेंबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या टी20 मालिकेतील पहिला सामना आज हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडीयमवर होणार आहे.
2019 विश्वचषकानंतर दक्षिण आफ्रिकेची ही पहिलीच मालिका असणार आहे. तर भारतीय संघ यशस्वी वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी20 मालिका खेळण्यासाठी उतरणार आहे.
दक्षिण आफ्रिकेने याआधी भारतात 4 वर्षांपूर्वी 2015मध्ये टी20 मालिका खेळली आहे. तसेच त्या मालिकेतील दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला होता. पण त्यावेळी दक्षिण आफ्रिकेकडून खेळलेले हाशिम अमला, एबी डिविलियर्स आणि फाफ डू प्लेसिस हे महत्त्वाचे खेळाडू यावेळी टी20 मालिकेत असणार नाहीत.
अमला आणि डिविलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तर डूप्लेसिसचा टी20 मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आलेला नाही. यावेळी टी20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व यष्टीरक्षक क्विंटॉन डीकॉक सांभाळणार आहे. तर रस्सी व्हॅन डर दसन उपकर्णधार आहे.
त्याचबरोबर भारतीय संघात यावेळी युवा गोलंदाजांचा समावेश आहे. यात राहुल, दिपक हे चाहर बंधू, खलील अहमद, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश आहे. तसेच कृणाल, हार्दिक या पंड्या बंधूंचा देखील भारतीय संघात समावेश आहे.
त्यामुळे जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार यांच्या अनुपस्थितीत हे युवा गोलंदाज कशी कामगिरी करणार हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
तसेच वेस्ट इंडीज विरुद्ध टी20 मालिकेत भारतीय संघाच्या 11 जणांच्या संघात मनिष पांडेला संधी देण्यात आली होती. तर श्रेयस अय्यरला संधी मिळाली नव्हती. त्यामुळे आता यावेळी कोणाला संधी मिळणार की दोघांनाही 11 जणांच्या संघात घेणार हे देखील पहावे लागणार आहे.
या सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याचीही शक्यता आहे.
आत्तापर्यंत भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात 13 टी20 सामने झाले आहेत. त्यातील 5 सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत. तर 8 सामने भारताने जिंकले आहेत.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात होणाऱ्या पहिल्या टी20 सामन्याबद्दल सर्वकाही…
कधी होणार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिला टी20 सामना?
– भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिला टी20 सामना आज(15 सप्टेंबर) होणार आहे.
किती वाजता सुरु होणार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिला टी20 सामना?
-भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिला टी20 सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल.
कुठे होणार आहे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिला टी20 सामना?
-भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिला टी20 सामना हिमाचलप्रदेश क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडीयम, धरमशाला येथे होणार आहे.
कोणत्या चॅनेलवर पाहता येणार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिला टी20 सामना?
– भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिला टी20 सामना स्टार नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येणार आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिला टी20 सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?
– भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिला टी20 सामना हॉटस्टार या वेबसाईटवर ऑनलाईन पाहता येईल.
यातून निवडले जातील 11 जणांचे संघ-
भारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, खलील अहमद, दीपक चाहर, नवदीप सैनी
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (कर्णधार), रस्सी व्हॅन डर दसन (उपकर्णधार), तेंबा बावूमा, ज्युनियर डाला, बीजॉर्न फॉरच्यून, बोरन हेंड्रिक्स, रीझा हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, एन्रीच नॉर्जे, अॅन्डिले फेहलुकवायो, ड्वेन प्रीटोरियस, ताब्राईज शम्सी, जॉन-जॉन स्मट्स.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–इंजिनियर्स डे विशेष: क्रिकेटमधील ते ११ इंजिनियर…
–निवृत्तीचा निर्णय मागे घेतलेला अंबाती रायडू झाला या संघाचा कर्णधार
–…म्हणून धोनीबरोबरील तो फोटो शेअर केला होता, विराट कोहलीने केला खूलासा, पहा व्हिडिओ