भारतीय पुरूष क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्यास सज्ज आहे. दक्षिण आफ्रिकेचा हा पाच महिन्यांतील दुसरा भारतीय दौरा आहे. दक्षिण आफ्रिका जून महिन्यात भारताच्या दौऱ्यावर आली होती. तेव्हा खेळली गेलेली पाच सामन्यांची टी20 मालिका 2-2 अशी बरोबरीत राहिली. या मालिकेत भारताकडून टी20 विश्वचषकात खेळणाऱ्या रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक या दोघांपैकी कोणाला खेळवावे याबाबत चर्चा सुरू आहे.
युवा विकेटकीपर रिषभ पंत (Rishabh Pant) याची मागील टी20 मालिकेतील कामगिरी पाहिली तर अनुभवाप्रमाणे दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) सरस ठरत आहे. पंतने जून महिन्यात आलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिकेत भारताचे नेतृत्व केले होते. मात्र सध्या त्याचे टी20 संघातील स्थानच धोक्यात आले आहे. त्या मालिकेत भारताचे नेतृत्व सुरूवातीला रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या अनुपस्थितीत केएल राहुल करणार होता, मात्र दुखापतीमुळे पंतने कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली. त्यामध्ये संघाला जिंकला आले नसले तरी पराभव होता होता थोडक्यात बचावला कारण पहिले दोन्ही सामन्यात पाहुण्या संघाने बाजी मारली होती.
पंतची ही भारताचे नेतृत्व करण्याची पहिलीच वेळ होती. तो यामध्ये अपयशी ठरला असला तर फलंदाजीतही त्याने निराशा केली. त्याने पाच सामन्यांमध्ये 14.50च्या सरासरीने 55 धावा केल्या. पंत टी20मध्ये अपयशी ठरला असला तरी त्याने कसोटीमध्ये सामनाविजयाची भुमिका निभावली आहे. मात्र टी20 विश्वचषकाच जवळ आला असता त्याच्या कामगिरीने संघव्यवस्थापक चिंतेत पडले आहे.
पंतची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेतील प्लेईंग इलेवनमधील जागा धोक्यात येण्यामागचे कारण म्हणजे रोहितने मागील अनेक सामन्यांमध्ये कार्तिकला संधी दिली आहे. पंत की कार्तिक याबाबत बोलताना रोहित म्हणाला, ‘पंत कि कार्तिक यांपैकी कोणाला घ्यावे हे विरोधी संघाच्या गोलंदाजांवर अबलंबून असते.’
कार्तिकने भारताकडून 53 टी20 सामन्यात खेळताना एक अर्धशतक केले आहे, तर पंतने 59 सामन्यांत खेळताना 3 अर्धशतके केली आहेत. आकडेवारी जरी पंतची उत्तम असली तरी मागील काही सामन्यांमध्ये कार्तिकने मॅचविनिंग खेळी केल्या आहेत. त्याने काही सामन्यांंमध्ये फिनिशरचीही भुमिका चांगली निभावली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvSA| हार्दिकसह तीन खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर; ताज्या दमाच्या खेळाडूंना संधी
दिग्गज गोलंदाजाचा दीप्ति शर्माला सपोर्ट! म्हणाले, ‘नॉन स्ट्रायकरला रनआऊट करणे योग्य, पण…’
अर्जुन तेंडुलकरचा युवराज सिंगच्या वडीलांसोबत भांगडा डान्स, व्हिडीओ व्हायरल