---Advertisement---

VIDEO: झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात विराटने छाती, तर चाहत्यांनी धरले डोके; काळजी करण्याचे कारण…

Virat Kohli
---Advertisement---

टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022च्या स्पर्धेत भारताचा स्फोटक फलंदाज विराट कोहली याचीच सर्वाधिक चर्चा सुरू आहे. त्याने आशिया चषक 2022पासून जो फॉर्म परत मिळवला तो ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषकात कायम आहे. त्याने आतापर्यंत या स्पर्धेच्या चालू हंगामात 5 सामन्यात खेळताना 3 अर्धशतके केली. नुकतेच त्याने त्याचा 34वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी (6 नोव्हेंबर)भारताचा सामना झिम्बाब्वेशी झाला. हा सामना भारताने जिंकला, मात्र यामध्ये विराटच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओने सगळ्यांचीच झोप उडाली.

क्रिकेटच्या मैदानात क्रिझवर सर्वात जलद कोण धावतो तर अर्थातच उत्तर येते विराट कोहली (Virat Kohli). झिम्बाब्वे विरुद्ध त्याने 25 चेंडूत 26 धावा केल्या. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला. सामन्यात धावा घेताना विराट त्याची छाती पकडताना दिसला. नुकतेच तो 34 वर्षाचा झाला. त्याच्या फिटनेसबाबत तो किती सजग असतो हे सर्वानाच माहित आह, मात्र रविवारी तो जलद धावा घेताना अस्वस्थ दिसला. याची अधिक माहिती समोर आली नाही.

विराट एकेरी-दुहेरी (रनिंग बीटविन द विकेट) धावा घेण्यात पटाईत आहे. जलद धावा घेताना आपण त्याला अनेकदा पाहिले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, झिम्बाब्वेचा सामन्यात जेव्हा त्याने छातीला हात लावला तेव्हा तो दिर्घ श्वास घेताना दिसला. यामुळे चाहत्यांचा जीवही खाली-वर झाला, यामध्ये चिंता करण्यासारखे काही कारण नाही कारण लगेचच तो ठिक दिसला आणि पुढे खेळ सुरू झाला.

या सामन्यासाठी भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर समालोचन करत होते. त्यांनी विराटच्या फिटनेसवर प्रश्न निर्माण झाल्यावर म्हटले दुसरी धाव घेण नेहमीच कठीण असते. त्यांनी म्हटले, “तो विकेटदरम्यान नेहमीच जलद पळतो. जेव्हा त्याने चेंडू खेळला तेव्हा त्याला माहित असते की क्षेत्ररक्षक कुठे उभा आहे आणि आपण किती धावा घ्यावा. या सामन्यातही त्याला वाटले दुसरी धावा घेऊ शकेल, मात्र तसे झाले नाही. तेव्हा त्याने स्वत: ला थोडा ब्रेक दिला आणि दिर्घ श्वास घेतला.”

नाणेफेक जिंकत प्रथम भारताने फलंदाजी करताना 20 षटकात 5 विकेट्स गमावत 186 धावा केल्या. झिम्बाब्वे जेव्हा फलंदाजीसाठी उतरला तेव्हा क्षेत्ररक्षण करताना विराटने पहिल्याच चेंडूवर वेस्ली मधेवेरे (Wessly Madhevere) उत्तम झेल घेतला. यावरूनही तो एकदम ठिक आहे, हे समजून येते. हा सामना भारताने 71 धावांनी जिंकला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सेमी फायनलमध्ये भारतीय संघात दिसेल ‘हा’ महत्वाचा बदल, स्वतः मुख्य प्रशिक्षकांनी दिलेत संकेत
एकेवेळी पराभवाच्या गर्तेत अडकलेल्या पाकिस्तानचा कर्णधार म्हणतोय, ‘आता आम्हाला चढलाय जोश’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---