सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना खेळला जात आहे. हा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क क्रिकेट स्टेडियमवर सुरू आहे.
चेन्नई येथे झालेल्या पहिल्या सामन्यात स्टार फलंदाज विराट कोहली सपशेल फ्लॉप झाला होता. त्यामुळे आता दुसऱ्या कसोटीत चाहत्यांना त्याच्या बॅटमधून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. सध्या विराट कोहलीचा एक छोटा चाहता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो कोहलीला पाहण्यासाठी तब्बल 58 किलोमीटर सायकल चालवून ग्रीन पार्क क्रिकेट स्टेडियमवर पोहोचला आहे.
भारतातील क्रिकेटची क्रेझ सर्वांनाच माहित आहे. अवघ्या 15 वर्षांचा कार्तिकेय देखील विराट कोहलीचा खूप मोठा चाहता आहे. उत्तर प्रदेशातल्या उन्नाव येथील रहिवासी असलेल्या कार्तिकेयनं कोहलीची एक झलक पाहण्यासाठी कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमपर्यंत 58 किलोमीटर सायकल चालवली.
कार्तिकेयनं पहाटे 4 वाजता त्याच्या सायकलवरून प्रवास सुरू केला. तो 11 वाजताच्या सुमारास स्टेडियमवर पोहोचला. मी कोहलीला भेटण्यासाठी जात असल्याचं त्यानं त्याच्या पालकांना सांगितलं आहे. तुम्ही त्याचा व्हिडिओ येथे पाहू शकता.
A 15-year-old kid rode 58 kilometers on his bicycle just to watch Virat Kohli bat pic.twitter.com/rigqQBoCHq
— A (@_shortarmjab_) September 27, 2024
भारत-बांगलादेश कसोटीला शुक्रवार (27 सप्टेंबर) पासून कानपूरमध्ये सुरुवात झाली. सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसाची शक्यता 96 टक्के आहे. तसेच वादळाची 58 टक्के शक्यता आहे. अशा स्थितीत पहिल्या दिवसाच्या खेळावर परिणाम होऊ शकतो. हवामान अंदाजानुसार, सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत पावसाची शक्यता 40 टक्के ते 74 टक्क्याच्या दरम्यान असेल.
दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग 11
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
बांगलादेश – नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, शकीब अल हसन, हसन महमूद, तैजुल इस्लाम, खालिद अहमद
हेही वाचा –
कानपूर कसोटीत राडा! बांगलादेशच्या चाहत्याला बेदम मारहाण, हिंसाचाराचा व्हिडिओ व्हायरल
अजबच! कानपूरमध्ये चाहत्यांच्या संरक्षणासाठी लंगूरची मदत! काय आहे प्रकरण?
ग्राऊंड स्टाफही विराट कोहलीचे जबरे फॅन! मनाला स्पर्श करणारा व्हिडिओ व्हायरल