भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंड संघाला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, एकेकाळी असे वाटत होते की धावांचा पाठलाग टीम इंडियासाठी कठीण होईल. परंतु शेवटच्या षटकाच्या सुरुवातीला भारताने लक्ष्य गाठले. मालिकेत 2-0 ने पिछाडीवर पडल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने त्यांचा संघ का हरला आणि पराभवासाठी जबाबदार खेळाडू कोण होता हे स्पष्ट केले आहे. या सामन्यात इंग्लंडने 165 धावा केल्या होत्या. ज्या भारताने 19.2 षटकांत पूर्ण करून सामना जिंकला.
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने सामन्यानंतरच्या सादरीकरण समारंभात पराभवाच्या कारणांबद्दल बोलताना म्हणाला, “हा एक उत्तम सामना होता. त्यांना (भारत) विजय मिळवून दिल्याबद्दल संपूर्ण श्रेय तिलक वर्माला जाते. आम्ही खूप संधी निर्माण केल्या पण त्या खरोखरच बेधडकपणे फलंदाजी केली. त्याची खेळी पाहून खूप आनंद झाला. आम्ही ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्यावर मी खरोखरच आनंदी आहे. आम्ही काही विकेट्स गमावल्या पण आम्हाला आवश्यक असलेल्या आक्रमकतेमुळे आम्ही खेळावर नियंत्रण मिळवले. आम्ही जवळजवळ बचावात्मक धावसंख्या गाठली होती पण आम्हाला सामना जिंकता आला नाही”.
कर्णधार बटलर पुढे म्हणाला, “आम्ही ज्या पद्धतीने खेळलो त्यावर मी खरोखरच खूश आहे. बऱ्याच सकारात्मक गोष्टी आहेत. जेमी स्मिथने पदार्पणात ज्या पद्धतीने खेळला ते अद्भुत होते. ब्रायडन कार्सने देखील अष्टपैलू कामगिरी केली. आम्ही आमच्या कामगिरीने खरोखरच खूश आहोत”.
तिसऱ्या टी20 सामन्यासाठी दोन्ही संघ राजकोटमध्ये आमनेसामने येतील. हा सामना 28 जानेवारी रोजी खेळवला जाईल. हा सामना जिंकून भारतीय संघ मालिका खिश्यात घालण्याच्या हेतू मैदानात उतरेल.
हेही वाचा-
तिलक कौतुकास पात्र, पण या खेळाडूचीही उपयुक्त कामगिरी, भारताच्या विजयाचा खरा ‘नायक’ कोण?
गौतम गंभीरच्या गुरुमंत्राने टीम इंडियाचा विजय, सामन्यानंतर तिलक वर्माची मोठी प्रतिक्रिया…
तिलक वर्मा समोर सूर्याचा नमन, 22 वर्षीय खेळाडूच्या प्रतिक्रियेने जिंकली मने, पाहा VIDEO