भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामना सेंच्युरियनच्या सुपर स्पोर्ट्स पार्कवर खेळला जात आहे. केएल राहुल याच्या शतकी खेळीमुळे भारतीय संघाने या सामन्याच्या पहिल्या डावात 245 धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक गमावल्यानंतर भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. भारताला 250 धावांच्या आतमध्ये गुंडाळण्यासाठी वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा याची भूमिका सर्वात महत्वाची ठरली.
पहिल्या डावात भारतासाठी केएल राहुल याने 137 चेंडूत 101 धावांची सर्वोत्तम खेळी केली. तसेच विराट 38 धावांची खेळी केल्यानंतर दुसरी सर्वोत्तम खेळी करणारा भारतीय ठरला. श्रेयस अय्यर 31, शार्दुल ठाकूर याने 24 धावांचे योगदान दिले. त्याव्यतिरिक्त संघातील एकही खेळाडू 20 धावांपेक्षा मोठी खेळी करू शकला नाही. पाच खेळाडू एक आकडी धावसंख्येवर बाद झाले.
दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा याने 20 षटकांमध्ये 59 धावा खर्च करून सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. नांद्रे बर्गर यायनेही 16 षटकात 52 धावा खर्च केल्यानंतर 3 विकेट्स नावावर केल्या. मार्को जेन्सन आणि गेराल्ड कोएत्झी यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. (IND vd SA India reached 245 runs in the first innings of the Boxing Day Test)
पहिल्या कसोटीसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन-
दक्षिण आफ्रिका संघ-
डीन एल्गर, एडेन मार्करम, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काईल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सेन, गेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर.
भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
महत्वाच्या बातम्या-
‘समालोचकांनी प्लेयर ऑफ द मॅच निवडला नाही पाहिजे…’, गंभीरच्या विधानाने वेधले क्रिकेट विश्वाचे लक्ष
एकच मारला, पण सॉलिड मारला! मॅक्सवेलचा 92 मीटरचा षटकार थेट स्टेडिअमच्या छतावर, व्हिडिओ पाहाच






