---Advertisement---

IND vs AFG । पहिल्या टी20तून विराटनंतर जयस्वालची माघार, नाणेफेक जिंकून रोहितने घेतली गोलंदाजी

On: गुरूवार, जानेवारी 11, 2024 6:49 PM
Rohit Sharma
---Advertisement---

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिका गुरुवारी (11 डिसेंबर) सुरू झाला. मालिकेतील पहिला सामना मोहालीमध्ये खेळला जात असून नाणेफेकीचा कौल रोहित शर्मा याच्या बाजून लागला. पाहुण्या अफगाणिस्तान संघाला नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी भारताकडून आमंत्रित करण्यात आले. रोहित शर्मा मोठ्या काळानंतर टी-20  संघात पुनरागमन होत आहे. सलामीवीर म्हणून चर्चेत असलेला यशस्वी जयस्वाल देखील दुखापतीच्या कारणास्तव या सामन्यातून बाहेर पडला. 

दुसरीकडे भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन यालाही पहिल्या कसोटीत फ्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. यशस्वी जयस्वाल रोहित शर्मा याच्यासोबत मोहाती सलामीला फलंदाजी करेल, असे सांगितले जात होते. पण सामन्याचा आदी त्याने मांडीच्या दुखापतीचे कारण देत सामन्यातून माघार घेतली.

रोहित शर्मा आणि विराट कोहली तब्बल 14 महिन्यांनंतर अफगाणिस्तानविरुद्ध आपला पहिला टी-20 सामना खेळणार होते. पण या गुरुवारी होणाऱ्या सामन्यातून विराटने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली. त्याव्यतिरिक्त केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव हे महत्वाचे फलंदाजही अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात खेळत नाहीयेत.  (IND vs AFG 1st t20i । India won the toss and opted to bowl first)

दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हन – 
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, टिळक वर्मा, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.

अफगाणिस्तान: रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रहमत शाह, अब्दुल्ला ओमरझाई, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, करीम जनात, फजलहक फारुकी, नवीन उल हक, मुजीब उर रहमान.

बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या – 
Video: चाहत्यानी सर्वांसमोरच धरले राहुलचे पाय, यष्टीरक्षकाच्या कृतीने जिंकली लोकांची मने
‘इंडिया अ कडून खेळणार की रणजी’, BCCIने दिलेल्या पर्यायावर ‘या’ क्रिकेटरने निवडले रणजी सामने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---