IND vs AFG 1st T20: मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला टी20 सामना खेळला गेला. यावेळी मोहालीच्या कडाक्याच्या थंडीमुळे खेळाडूंची अवस्था बिकट झाली होती. सामन्यादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानचे खेळाडू कोणत्या ना कोणत्या प्रकारे स्वत:ला उबदार ठेवण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, भारतीय कर्णधार रोहित शर्मा ‘हॉट वॉटर बॅग’ वापरताना दिसला.
लाइव्ह सामन्यादरम्यान रोहित शर्मा (Rohit Sharma) याने हात गरम ठेवण्यासाठी ‘हॉट वॉटर बॅग’चा वापर केला. भारतीय कर्णधार हात गरम करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मोहाली येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकीच्या वेळी अफगाणिस्तानचा कर्णधार इब्राहिम झद्रान यानेही नाणेफेक जिंकली असती तर प्रथम गोलंदाजी केली असती असे सांगितले होते. (ind vs afg 1st t20i rohit sharma use hot water bag in mohali to keep hands warm due to low temperature)
अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी20 सामन्यातून रोहित शर्मा दीर्घ कालावधीनंतर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला आहे. अफगाणिस्तान विरुद्ध खेळल्या गेलेल्या टी20 आधी रोहित शर्माने 2022 टी20 विश्वचषक स्पर्धेत शेवटचा सामना खेळला होता, जो स्पर्धेचा उपांत्य सामना होता जो नोव्हेंबरमध्ये खेळला गेला होता. विराट कोहली वैयक्तिक कारणांमुळे या सामन्यात खेळला नाही.
Rohit Sharma using hot water bag due to heavy cold in Mohali. pic.twitter.com/gFqUBTaQ8p
— Johns. (@CricCrazyJohns) January 11, 2024
प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघ 5 विकेट्सच्या नुकसानावर 158 धावांपर्यंत मजल मारू शकला. प्रत्युत्तरात भारतासाठी शिवम दुबे (Shivam Dube) याने 60 धावांची सर्वोत्तम खेळी केली आणि संघाला विजय मिळवून दिली. यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्मा (Jitesh Sharma) याने 20 चेंडूत 31 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. तत्पूर्वी सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) शुन्वायवर धावबाद झाला, पण शुबमन गिल (Shubman Gill) याने 23 धावांचे योगदान दिले. तसेच तिसऱ्या क्रमांकावर खेळताना तिलक वर्मा 26 धावा करून बाद झाला. फिनिशरच्या रुपात आलेला रिंकू सिंग (Rinku Singh) 16* धावांची खेळी करू शकला. अफगाणिस्तानसाठी मुजीब उर रहमान याने 2 तर, अजमतुल्ला उमरझाई (Azmatullah Umarzai) याने 1 विकेट घेतली. (IND vs AFG Mohali cold chills the players Rohit gets sick during the live match itself)
हेही वाचा
भारताला रडवणाऱ्या फलंदाजाने टेनिसच्या मैदानावर दिली जोकोविचला टक्कर, पाहा व्हायरल व्हिडीओ
रोहित आणि गिलमध्ये LIVE सामन्यात राडा, विजयानंतर कर्णधाराने जिंकले मन; म्हणाला, ‘माझी एवढीच इच्छा होती की….’






