India vs Afghanistan 3rd T20I: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना रंगतदार झाला. बुधवारी (17 जानेवारी) रोजी बेंगलोरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात सुपर ओव्हरनंतरही निकाल लागला नाही. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एका सामन्यात दोन सुपर ओव्हर्स खेळावे लागले. यासह, हा दुसरा सर्वाधिक धावांचा सामना होता, जो बरोबरीत संपला. असे आणखी काही विक्रम या सामन्यात झाले. (ind vs afg bengaluru t20i records and stats first ever international with 2 super over)
1- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका सामन्यात दोन सुपर ओव्हर टाकण्याची ही पहिलीच वेळ होती. आयपीएलमध्ये याआधी असे घडले आहे. आयपीएल 2020 मध्ये पंजाब विरुद्ध मुंबई सामन्यात दोन सुपर ओव्हर टाकल्या गेल्या होत्या.
2- या सामन्यात दोन्ही संघांनी 212-212 धावा केल्या. म्हणजे 40 षटकात एकूण 424 धावा झाल्या. इतक्या धावा करूनही सामना बरोबरीतच राहिला. सर्वाधिक धावाकरून टाय झालेल्या सामन्यांमध्ये हा सामना दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा क्राइस्टचर्च टी20 सामना आहे. 2010 मध्ये झालेल्या या टी20 मध्ये एकूण 428 धावा झाल्या होत्या.
3- रोहित शर्मा टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावे 5 शतके आहेत. तर सूर्यकुमार यादव आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या नावे प्रत्येकी 4 शतके आहेत.
4- या सामन्यात रोहित आणि रिंकूमध्ये 190 धावांची भागीदारी झाली होती. टी-20 आंतरराष्ट्रीय मधली ही भारताची सर्वात मोठी भागीदारी आहे. यापूर्वी दीपक हुडा आणि संजू सॅमसन यांच्यात 2022 मध्ये आयर्लंडविरुद्ध 176 धावांची भागीदारी झाली होती.
5- भारतीय संघाने येथे शेवटच्या दोन षटकात 58 धावा केल्या. टी20 क्रिकेटमध्ये 19व्या आणि 20व्या षटकात सर्वाधिक धावा करण्याचा हा विक्रम आहे. यापूर्वी हा विक्रम नेपाळच्या नावावर होता. त्यांनी 19व्या आणि 20व्या षटकात 55 धावा केल्या होत्या.
6- या सामन्यात शेवटच्या षटकात 36 धावा आल्या. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात 36 धावा करण्याची ही चौथी वेळ आहे. आजपर्यंत एका षटकात 36 पेक्षा जास्त धावा झाल्या नाहीत.
7- या सामन्यात शेवटच्या 5 षटकात 103 धावा झाल्या. 16व्या ते 20व्या षटकापर्यंत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत ही दुसरी वेळ आहे. यामध्ये नेपाळ पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांनी 16व्या ते 20व्या षटकापर्यंत 108 धावा केल्या होत्या. (One match many records became this big record in Bangalore T20 which is impossible to break)
हेही वाचा
IND vs AFG: ‘ती अश्विनची विचारसरणी होती…’ रोहित रिटायर्ड बाद होण्यावर प्रशिक्षक राहुल द्रविड यांचं लक्षवेधी विधान
IND vs AFG: विराट बेंगलोरमध्ये बनला सुपरमॅन, करीम जनातच्या षटकाराचे केले एका धावेत रूपांतर