---Advertisement---

IND vs AFG । रोहितने मजेत घेतलेला निर्णय संघाला पडला महागात! अवघ्या 22 धावांवर चार फलंदाज तंबूत

On: बुधवार, जानेवारी 17, 2024 7:45 PM
Virat Kohli
---Advertisement---

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना बुधवारी (17 जानेवारी) बेंगलोरमध्ये खेळला गेला. उभय संघांतील या सामन्यात भारताला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण संघाने या सामन्याची सुरुवात खूपच निराशाजनक पद्धतीने केली. भारताच्या पहिल्या चार विकेट्स ज्या खेळाडूंनी गमावल्या, त्यातील एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही.

या सामन्यातील भारतीय संघाला बसलेला पहिला झटका यशस्वी जयस्वाल याच्या रुपात होता. जयस्वाल याने 6 चेंडूत अवघ्या 4 धावा करून विकेट गमावली. त्यानंतर आलेला विराट कोहली पहिल्याच चेंडूवर बाद झाला. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोल्डन डक म्हणजे पहिल्या चेंडूवर शुन्य धावा करून बाद होण्याची ही विराटची पहिलीच वेळ आहे.

मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये शिवम दुबे भारतासाठी मॅच विनर ठरला होता. पण या बुधवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर दुबे 6 चेंडूत 1 धाव करून बाद झाला. संजू सॅमसन याला पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये बंचवर बसावे लागले होते. पण तिसऱ्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळून देखील सॅमसनला संघासाठी योगदान देता आले नाही. सॅमसन देखील विराटप्रमाणेच गोल्डन डकवर बाद झाला.

संघाची धावसंख्या अवघी 22 असताना भारताने सुरुवातीच्या या चार महत्वाच्या विकेट्स गमावल्या. यातील जयस्वाल, विराट आणि सॅमसन यांनी एकट्या फरीद अहमद याने तंबूत धाडले. तर अजमतुल्ला उमरझाई याने शिवम दुबेची शिकार केली. पावरप्लेची सहा षटके संपल्यानंतर भारताची धावसंख्या 4 बाद 30 धावा होती.

दरम्यान, भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने या सामन्याची नाणेफेक जिंकली होती. पण मागच्या दोन सामन्यांमध्ये प्रथम गोलंदाजी केली होती. म्हणून तिसऱ्या सामन्यात फलंदाजीचा निर्णय घेत आहे, असे रोहित म्हणाला. पण रोहितचा हा निर्णय संघाला महागात पडला, असे बोलले जात आहे.(IND vs AFG India lost 4 wickets for just 22 runs)

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन – 
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार.

अफगाणिस्तान – इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), गुलबदिन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, शराफुद्दीन अश्रफ, कैस अहमद, मोहम्मद सलीम साफी, फरीद अहमद मलिक.

महत्वाच्या बातम्या – 
थोडा चेंज! INDvsAFG तिसऱ्या टी-20 सामन्यात रोहितने मजेमजेत घेतली फलंदाजी, संघात तीन महत्वाचे बदल
India vs Afghanistan : विश्वचषकापूर्वी शेवटची संधी, संघात होऊ शकतात मोठ्ठे बदल; विराट-रोहितचं काय होणार?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---