भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा अफगानिस्तान विरूध्दच्या कसोटी सामन्यात खेळेल का नाही याबाबत शंका आहे. त्याला पुन्हा एकदा दुखापत झाल्याने या एकमेव कसोटी सामन्यात त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तो सध्या इंग्लंडमधील ससेक्स संघाकडून काऊंटी क्रिकेट खेळत आहे. मात्र रविवारी झालेल्या इसेक्स विरूध्दच्या सामन्यात त्याला दुखापतीमुळे संघाबाहेर बसावे लागले होते.
इशांतच्या या दुखापतीबद्दल ससेक्स संघाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून सांगितले.
🦈 One change for us today here at The Saffrons. @ollierobinson25 returns, replacing the injured @ImIshant.
Your Sussex Sharks XI: Wells, Wright, Finch, Brown*+, Evans, Burgess, Wiese, Archer, Jordan, Robinson, Briggs
🎥 A word from the skipper… #gosbts #SharkAttack pic.twitter.com/H56vhlsw8x
— Sussex Cricket (@SussexCCC) June 3, 2018
काऊंटी क्रिकेटच्या सुरूवातीच्याच मोसमात त्याला ग्लॉस्टरशायर संघाविरूध्द खेळताना खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळेच त्याला पुढच्या मिडीलसेक्स विरूध्दच्या सामन्यात खेळता नाही आले.
इशांतची ही दुखापत खूप चुकीच्या वेळेस आली आहे. त्याला अफगानिस्तान विरूध्दच्या कसोटी सामन्यात भारतीय संघात निवडले आहे. मात्र त्याला या सामन्यास मुकावे लागणार आहे असे दिसत आहे.
इशांत सुरू असलेल्या काऊंटी क्रिकेटमध्ये गोलंदाजीत सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. त्याने ससेक्ससाठी सुरूवातीच्या मोसमात चार सामन्यात 15 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने सध्या सुरू असलेल्या या अ दर्जाच्या 6 सामन्यात 8 विकेट्स घेतल्या आहेत.
अफगानिस्तान विरूध्दचा भारताचा एकमेव कसोटी सामना 14 जूनला होणार आहे. हा सामना बेंगलोर येथील एम चिन्नस्वामी या स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
अफगानिस्तान विरूध्दच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ-
अजिंक्य रहाणे(कर्णधार), चेतेश्वर पुजारा, शिखर धवन, मुरली विजय, के एल राहूल, दिनेश कार्तिक(यष्टीरक्षक), करूण नायर, आर अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या, इशांत शर्मा, शार्दुल ठाकूर