---Advertisement---

Virat Kohli । अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यातून विराटची माघार, ऐन वेळी द्रविडने दिली माहिती

On: बुधवार, जानेवारी 10, 2024 8:38 PM
Virat Kohli
---Advertisement---

भारतीय संघाचा धडाडीचा फलंदाच विराट कोहली अफगानिस्तानविरुद्द होणाऱ्या पहील्या टी20 सामन्यात सहभागी होणार नसल्याची माहीती समोर आली आहे. भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने ही माहीती दिली. गुरुवारी(11जानेवारी) अफगानिस्तान विरुद्ध भारत यांच्यात होणाऱ्या तीन टी20 सामन्यांच्या मालिकेची सुरवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना हा मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडीयमवर खेळवला जाणार आहे.

ही मालिका का महत्वाची?
यावर्षी होणाऱ्या टी20 विश्वचषक सामन्याच्या दृष्टीने या मालिकेकडे पाहण्यात येत आहे. या तीन टी20 सामन्यांच्या मालिकेनंतर विश्वचषकापुर्वी भारतीय संघ एकही टी20 सामना खेळणार नाही. यामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर भारताचे दोन दिग्गज खेळाडू रोहीत शर्मा आणि विराट कोहली यांनी संघ व्यवस्थापनाकडे या मालिकेचा भाग होण्याची विनंती केली होती. त्यानुसार ऐनवेळी दोघांचा संघात समावेश करण्यात आला. पण आता अचानक विराट कोहली पहिला सामना खेळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. “विराट अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात वैयक्तिक कारणामुळे खेळू शकणार नाही,” असे पत्रकार परिषदेत राहुल द्रविड यांनी सांगितले.

काय म्हणाला राहुल द्रविड?
विराट कोहली त्याच्या वयक्तिक कारणामुळे पहीला सामना खेळणार नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात तो सहभागी होणार आहे. पहिल्या सामन्यात विराटच्या जागी तिलक वर्मा टिम11चा भाग असेल. यासोबतच यशस्वी जयस्वाल रोहीत शर्मा सोबत सलामी फलंदाज म्हणून मैदानात उतरेल. अशी माहीती संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने दिली.

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 पहील्या सामन्यासाठीचा भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.

हे ही वाचा

मोठी बातमी! दिल्ली कॅपिटल्सच खेळाडू बलात्काराच्या आरोपात दोषी, न्यायलायाकडून आठ वर्षांची कोठडी

धक्कादायक! खेळपट्टीवर धावताना फलंदाजाचे निधन, सहकाऱ्यांनी CPR देऊनही सोडले प्राण

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---