वनडे विश्वचषक 2023च्या अंतिम सामन्यानंतर गुरुवारी (23 नोव्हेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा आमने सामने आहेत. उभय संघांतील पहिल्या टी-20 सामन्याची नाणेफेक भारताने जिंकली. सूर्यकुमार यादव या सामन्यात भारताचा कर्णधार असून त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विशाखापट्टणममध्ये हा सामना आयोजित केला गेला आहे.
सूर्यकुमार यादव याच्यासाठी हे कर्णधार म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व मॅथ्यू वेड करत आहे. विश्वचषकच्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने मात दिली होती. अंतिम सामन्यातील पराभव भारतासाठी नक्कीच सोपा नव्हता. अशात गुरुवारी सूर्यकुमारच्या नेतृत्वातील संघ पराभवाचा वचपा काढण्यासाठी प्रयत्न करेल.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
ऑस्ट्रेलियाः स्टीव स्मिथ, मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस (यष्टीक्षक), आरोन हार्डी, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (कर्णधार), शॉन ऍबॉट, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा.
भारतः यशस्वी जैस्वाल, रुतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), टिळक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, प्रसिध्द कृष्णा.
(IND vs AUS 1st t20i India won the toss & decided to bowl first )
बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या –
‘मनोबल खचलेले असताना…’, ड्रेसिंग रुममध्ये आलेल्या पंतप्रधान मोदींबाबत शमीची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! वर्ल्डकप खराब गेल्यानंतर स्टोक्सची आयपीएलमधूम माघार, जाणून घ्या कारण