भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी एकमेकांचा आमना-सामना करणार आहेत. कसोटीला सुरुवात होण्यापूर्वीच या मालिकेची जोरदार चर्चा रंगली आहे. भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनबाबतही भारतीय संघाचा उपकर्णधार केएल राहुल याने मोठे भाष्य केले आहे. त्याने प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्या योजनेमागील खुलासा केल्याचे बोलले जात आहे. नागपूर कसोटीत मैदानावर अंतिम अकरा खेळाडू कोण असतील, हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नाहीये.
नागपूर येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 9 फेब्रुवारी रोजी पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल. पहिल्या सामन्यापूर्वी संघाचा उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) याने मंगळवारी (दि. 7 फेब्रुवारी) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने फलंदाजी क्रमाविषयी विचारलेल्या प्रश्नाबद्दल सांगितले की, “हे पाहा संघ व्यवस्थापनाला वाटले की, मी मधल्या फळीत फलंदाजी केली पाहिजे, तर मला काहीच समस्या नाही. मी असे करण्यासाठी एकदम तयार आहे.”
पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्लेइंग इलेव्हन कशी असेल, या प्रश्नावर राहुल म्हणाला की, “सध्या आम्ही याबाबत ठरवले नाहीये की, प्लेइंग इलेव्हन कशी असेल. अद्याप अजून काही जागा भरायच्या बाकी आहेत. नागपूर कसोटीत तीन फिरकीपटूंसोबत उतरण्याबाबत कोणतीही घाई नाहीये.”
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक-
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पहिला कसोटी सामना 9 ते 13 फेब्रुवारीदरम्यान नागपूर येथे पार पडले. त्यानंतर दुसरा कसोटी सामना दिल्ली येथे 17 ते 21 फेब्रुवारीदरम्यान पार पडेल. याव्यतिरिक्त तिसऱ्या कसोटी सामन्यात भारत-ऑस्ट्रेलिया संघ धरमशाला येथे 1 ते 5 मार्चदरम्यान भिडतील. मालिकेतील शेवटचा कसोटी सामना अहमदाबाद येथे 9 ते 13 मार्चदरम्यान पार पडेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन कसोटीसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनादकट, सूर्यकुमार यादव (ind vs aus 1st test kl rahul on playing xi know what he said)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत ‘किंग कोहली’च्या निशाण्यावर 3 रेकॉर्ड, सचिनच्या विक्रमालाही बसू शकतो धक्का
‘हा’ खेळाडू करणार पदार्पण? ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीच्या 48 तासांपूर्वीच माजी प्रशिक्षकाचा मोठा दावा