भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात गुरुवारपासून (दि. 23 नोव्हेंबर) 5 सामन्यांच्या टी20 मालिकेची सुरुवात झाली. विशाखापट्टणम येथे पार पडलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने 2 विकेट्सने विजय मिळवला. तसेच, मालिकेत 1-0ने आघाडी घेतली. या सामन्यात भारतीय संघाच्या अनेक फलंदाजांनी शानदार प्रदर्शन केले, पण उपकर्णधार ऋतुराज गायकवाड याच्या हाती निराशा लागली. कारण, तो पहिल्याच षटकात धावबाद होऊन तंबूत परतला. त्यामुळे त्याला एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही.
कसा झाला बाद?
ऑस्ट्रेलिया (Australia) संघाने नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी केली. त्यांनी यावेळी निर्धारित 20 षटकात 3 विकेट्स गमावत 208 धावा केल्या होत्या. या 209 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने पहिल्या 4 चेंडूत 10 धावा केल्या, पण पाचव्या चेंडूवर यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांच्यातील ताळमेळ बिघडला आणि उपकर्णधार ऋतुराजला विकेट गमवावी लागली. यानंतर चाहतेही सोशल मीडियावर ही यशस्वीची चूक असल्याचे म्हणत आहेत.
https://twitter.com/ShuhidAufridi/status/1727748773747822795
जयसवाल याने बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने शॉट मारला आणि पहिली धाव वेगाने घेतली. मात्र, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला, पण क्रीजवरून थोडा बाहेर निघताच, त्याने धाव घेण्यास नकार दिला. मात्र, तोपर्यंत ऋतुराज खूप पुढे गेला होता. त्याच्याकडे परत जाण्याचा मार्गच नव्हता. याचा फायदा ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी घेतला. तसेच, ऋतुराजला धावबाद होऊन परत तंबूत जावे लागले. अशाप्रकारे ऋतुराजचा खेळ एकही चेंडू न खेळताच संपला.
टी20त ऋतुराज गायकवाड डायमंड डक बाद होणारा भारताचा तिसरा फलंदाज
अशाप्रकारे टी20त ऋतुराज गायकवाड डायमंड डक (Ruturaj Gaikwad Diamond Duck) पद्धतीने बाद होणारा भारताचा तिसरा फलंदाज ठरला. त्याच्यापूर्वी अमित मिश्रा आणि जसप्रीत बुमराह यांच्या नावावर हा नकोसा विक्रम होता. 2016मध्ये श्रीलंकेविरुद्ध बुमराह डायमंड डकवर बाद झाला होता. तसेच, 2017मध्ये अमित मिश्राही इंग्लंडविरुद्ध एकही चेंडू न खेळता तंबूत परतला होता. (ind vs aus 2023 opener ruturaj gaiwad becomes 3rd indian batter to register diamond duck in t20i)
हेही वाचा-
“मला माही भाईने सांगितले होते…”, नवा फिनिशर रिंकूने दिले धोनीला क्रेडिट
World Cup Final मध्ये ऑस्ट्रेलियाने केलेल्या हुशारीचा अश्विनकडून खुलासा, म्हणाला, “त्यांनी आयपीएल…”






