---Advertisement---

IND vs AUS । यशस्वीने फोडली ऑसी गोलंदाजी! पॉवर प्लेमध्येच रचला विक्रम

On: रविवार, नोव्हेंबर 26, 2023 7:59 PM
Yashasvi Jaiswal
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-20 सामना रविवारी तिरुवनंतपुरम याठिकाणी खेळला गेला. भारताला नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले. मालिकेतील पहिल्या सामन्यात अपयशी भारताची सलामीवीर जोडी, दुसऱ्या सामन्यात चांगली कामगिरी करताना दिसली. यशस्वी जयस्वाल याचे अर्धशतक विक्रमी ठरले.

यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याने अवघ्या 24 चेंडूत अर्धशतकी खेळी, या सामन्यात केली. त्याने या सामन्यात 25 चेंडूत 53 धावा केल्या आणि नॅथन एलिस याच्या चेंडूवर ऍडम झॅम्पा याच्या हातात झेलबाद झाला. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी जयस्वाल भारतासाठी पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. यापूर्वी हा विक्रम दिग्गज रोहित शर्मा याच्या नावावर होता.

भारतासाठी पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज (टी-20 आंतरराष्ट्रीय)
यशस्वी जयस्वाल – 53 विरुद्ध ऑस्ट्रेलिया (2023)
रोहित शर्मा – 50* विरुद्ध न्यूझीलंड (2020)
केएल राहुल – 50 विरुद्ध स्कॉटलॅन्ड (2021)

दरम्यान, जयस्वालच्या या वादळी अर्दशतकामुळे भारतीय संघ 10 षटकांमध्ये एका विकेटच्या नुकसानावर 101 धावांपर्यंत मजल मारू शकला. उभय संघांतील ही टी-20 पाच सामन्यांची आहे. पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वातील भारताने 2 विकेट्सने विजय मिळवला होता. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह या वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेत विश्रांती दिली गेली आहे.
(IND vs AUS 24 ball FIFTY for Yashasvi Jaiswal)

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – यशस्वी जैस्वाल, रुतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा.

ऑस्ट्रेलिया – स्टीव्हन स्मिथ, मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस, मार्कस स्टॉयनिस, टिम डेव्हिड, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक आणि कर्णधार), शॉन ऍबॉट, नॅथन एलिस, ऍडम झाम्पा, तन्वीर संघा.

महत्वाच्या बातम्या – 
IPL 2024 साठी RCB ने रिटेन केले धाकड 18! बडे विदेशी खेळाडू बाहेर 
IPL 2024 Retention: मुंबई इंडियन्सचे रिटेन खेळाडू जाहीर, मोठ्या नावांना दिला नारळ, वाचा यादी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---