सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वातील भारतीय संघाचा विजयीरथ सुरूच आहे. रविवारी (दि. 26 नोव्हेंबर) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना तिरुवनंतपुरम येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात चमकदार कामगिरी केली. तसेच, ऑस्ट्रेलियाचा 44 धावांनी धुव्वा उडवला. हा विजय मिळवण्यासह भारताने मालिकेत 2-0ने आघाडी घेतली. या सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव खूपच खुश झाला. त्याने खेळाडूंचे कौतुक केले.
सूर्याची प्रतिक्रिया
ऑस्ट्रेलियाला नमवल्यानंतर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने संघाच्या प्रदर्शनाचे कौतुक केले. तो म्हणाला, सर्वजण चांगली कामगिरी करत आहेत. सूर्याने त्याच्या नेतृत्वाविषयी बोलताना म्हटले की, खेळाडू त्याच्यावर जास्त दबाव टाकत नाहीयेत. खेळाडूंना त्यांची भूमिका समजावली आहे.
रिंकूचे कौतुक
तो म्हणाला, “सर्व खेळाडू शानदार काम करत आहेत. तसेच, ते माझ्यावर एक कर्णधार म्हणून जास्त दबावही टाकत नाहीयेत. मी खेळाडूंना आधीच म्हटले होते की, पहिली फलंदाजी करण्यासाठी तयार राहा आणि त्यानुसार तयारी करा. मागील सामन्यात आपण रिंकू सिंगला पाहिले होते आणि या सामन्यातही त्याने खूप चांगले प्रदर्शन केले.”
सूर्याची खेळी
या सामन्यात सूर्यकुमार यादव याला मोठी खेळी करता आली नाही, पण त्याने संघाच्या धावसंख्येत भर घालण्यात खारीचा वाटा उचलला. त्याने 10 चेंडूंचा सामना करताना 19 धावा केल्या. या धावा करताना त्याच्या बॅटमधून 2 षटकारही निघाले. विशेष म्हणजे, सूर्याने पहिल्या सामन्यात 80 धावांची विस्फोटक खेळी केली होती.
पुढील सामना कुठे खेळला जाणार?
या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 विकेट्स गमावत 235 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया 20 षटकात 9 विकेट्स गमावत 191 धावाच करू शकला. त्यामुळे हा सामना भारताने 44 धावांनी जिंकला. या विजयासह भारताने 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत आघाडी घेतली आहे. भारत 2-0ने पुढे आहे. विशेष म्हणजे, भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सामना 2 विकेट्सने जिंकला होता.
आता मालिकेतील तिसरा सामना 28 नोव्हेंबर रोजी गुवाहाटी येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया पुनरागमनाचा प्रयत्न करेल, तर भारत विजयाची हॅट्रिक करण्यावर लक्ष देईल. (ind vs aus 2nd t20i captain suryakumar yadav statement after win the match against australia)
हेही वाचा-
टीम इंडियाची ‘यंग ब्रिगेड’ सुसाट! सलग दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला चारली धूळ, यशस्वी-बिश्नोई चमकले
VIDEO: पहिल्याच चेंडूवर सूर्याने मारला ‘सुपला शॉट’, तुम्ही पाहिला का नेत्रदीपक सिक्स?