---Advertisement---

अर्रर्र! पावसामुळे रद्द होणार INDvsAUS 2nd T20I सामना? एकाच फोटोने वाढवलं टेन्शन

On: शनिवार, नोव्हेंबर 25, 2023 5:21 PM
Suryakumar-Yadav
---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना जास्त धावसंख्येचा राहिला. गुरुवारी (दि. 23 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 209 धावांचे आव्हान भारताने 2 विकेट्स राखून पार केले. तसेच, मालिकेत 1-0ने आघाडी घेतली. अशात भारतीय संघाची नजर मालिकेत 2-0ने आघाडी घेण्यावर असेल. चला तर, या मालिकेतील दुसऱ्या टी20 सामन्याविषयी जाणून घेऊयात…

कधी आणि कुठे खेळला जाणार दुसरा टी20 सामना?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना केरळच्या तिरुवनंतपुरम (Thiruvananthapuram) येथे खेळला जाणार आहे. दोन्ही संघ तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफील्ड इंटरनॅशनल स्टेडिअममध्ये आमने-सामने असतील. हा सामना रविवारी (दि. 26 नोव्हेंबर) सायंकाळी 7 वाजता खेळला जाईल.

सामना कुठे पाहायचा?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvAUS) संघातील टी20 मालिका स्पोर्ट्स 18 आणि कलर्स सिनेप्लेक्सवर पाहता येतील. तसेच, डीडी फ्री डिश वापरणारे प्रेक्षक डीडी स्पोर्ट्सवर मोफत सामने पाहू शकतील. तसेच, या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा ऍपवरही पाहता येतील.

पावसामुळे येणार का व्यत्यय?
रिपोर्ट्सनुसार, तिरुवनंतपुरम येथे 26 नोव्हेंबर रोजी पावसाची शक्यता 55 टक्के आहे. मागील काही दिवसांपासून पाऊस पडत असला, तरीही सामन्याच्या वेळी आकाश स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे. सरासरी तापमान 25 अंश सेल्सियस असेल. स्टेडिअममध्ये ताशी 10 ते 15 किमी वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे. जसजशी रात्र होत जाईल, तसे तापमान हळूहळू 25 अंश सेल्सियसपर्यंत खाली येऊ शकतो. सामन्याच्या एक दिवस आधीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात मैदानावर पाणी असल्याचे दिसत आहे. यामुळे सर्वांच्या चिंता वाढल्या आहेत. असे असले, तरीही सामना जर रद्द झाला, तरीही भारत मालिकेत 1-0ने आघाडीवर असेल.

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1728370882618233330

मैदानावरील आकडेवारी
तिरुवनंतपुरम येथील मैदानावरील भारतीय संघाची आकडेवारी चांगली आहे. भारताने या मैदानावर आतापर्यंत एकूण 3 टी20 सामने खेळले आहेत. आता भारत सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्या नेतृत्वाखाली चौथ्या सामन्यासाठी रविवारी मैदानात उतरेल.

भारताने खेळलेल्या 3 सामन्यांपैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे, तर 1 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारताने या मैदानावर पहिला टी20 सामना नोव्हेंबर 2017मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळत 6 धावांनी जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात 8 विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता. हा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध होता. त्यानंतर भारताने तिसऱ्या टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 8 विकेट्सने विजय मिळवला होता. हा सामना सप्टेंबर 2022मध्ये खेळला गेला होता. (ind vs aus 2nd t20i live telecast live streaming know all details when and where to watch)

हेही वाचा-
‘आग लागल्याशिवाय धूर निघत नाही…’, पंड्याच्या मुंबई इंडियन्समध्ये जाण्याविषयी भारतीय दिग्गजाचे मोठे विधान
भारताच्या पराभवानंतर खूप गाजला ‘पनौती’चा वाद, आता शमीनेही दिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘हा राजकीय अजेंडा…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---