भारतीय संघाने मागील 4 वर्षांपासून मायदेशात वनडे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया संघावर वर्चस्व गाजवले आहे. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 21 धावांनी पराभूत केले. तसेच, मालिका 2-1ने आपल्या नावावर केली. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध एकूण आठवी आणि भारतातील सहावी वनडे मालिका खिशात घातली.
यापूर्वी भारतीय संघ 2019मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच मायदेशातील वनडे मालिकेत पराभूत झाला होता. या विजयानंतर कदाचित पाहुण्या संघाचे बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये 2-1ने मिळालेल्या पराभवाचे दु:ख नक्कीच कमी झाले असेल. तिसऱ्या वनडेत काही वादग्रस्त क्षणही पाहायला मिळाला. त्याचबद्दल आपण जाणून घेऊया…
विराट कोहली आणि मार्कस स्टॉयनिस भिडले
झाले असे की, भारताच्या डावातील 21वे षटक मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) टाकत होता. यावेळी गोलंदाजीसाठी क्रीझच्या दिशेने येताच विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची टक्कर झाली. यानंतर स्टॉयनिसने दुसरीकडे पाहिले आणि विराट त्याच्याकडे एकटक बघू लागला. यावेळी दोघांमध्येही तणाव पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, आयपीएलमध्ये विराट आणि स्टॉयनिस हे आरसीबी संघाकडून खेळले आहेत.
Virat Kohli and Marcus Stoinis friendly face-off. pic.twitter.com/eNsBVO3vOH
— Vijay (@VIJAYANAYAK17) March 22, 2023
Neeku k ramp ey ra @MStoinis 😒#INDvsAUS pic.twitter.com/TVBOrfI14n
— ' (@mrlittleboy18) March 22, 2023
यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या डावादरम्यानही दोन भारतीय खेळाडू भिडले होते. खरं तर, तिसऱ्या वनडे सामन्यातील पहिल्या डावाच्या 39वे षटक कुलदीप यादव (Kuldeep Yadav) टाकत होता. ऍश्टन एगरविरुद्ध भारतीय संघाने अपील केली होती. मात्र, पंचांनी त्याला नाबाद दिले. यानंतर कुलदीपने कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला डीआरएस घेण्यास सांगितले. यावेळी रोहितने हसत हसत डीआरएस घेतला. मात्र, त्यानंतर अचानक रोहितचे हावभाव बदलले आणि तो रागावून कुलदीपला काहीतरी बोलू लागला. मात्र, हे स्पष्ट नाहीये की, रोहित कोणत्या गोष्टीवरून कुलदीपला बोलत होता.
सामन्याचा आढावा
सामन्याबाबत बोलायचं झालं, तर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 49 षटकात सर्व विकेट्स गमावत 269 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 49.1 षटकात 10 विकेट्स गमावत 248 धावाच करता आल्या. त्यामुळे तिन्ही क्रिकेट प्रकारात 26 मायदेशी मालिका जिंकण्यानंतर भारतीय संघाला पहिला पराभव पत्करावा लागला. या मालिकेत 194 धावा करणाऱ्या मिचेल मार्श याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच, तिसऱ्या सामन्यात 45 धावा देत 4 विकेट्स घेणाऱ्या ऍडम झम्पा याला सामनावीर सन्मानित केले गेले. (ind vs aus 3rd odi virat kohli and marcus stoinis video kuldeep yadav wrong drs rohit sharma reaction)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी आयुष्यात 10 वेळा सर्जरी केली, आता बुमराहदेखील लवकरच…’, ब्रेट लीचे ‘बूम बूम’विषयी मोठे भाष्य
चेन्नई वनडेतील पराभवानंतर दिग्गजाने विराटला सुनावले खडे बोल! म्हणाला, “अशा परिस्थितीत फटके खेळताना…”