INDvsAUS 3rd T20: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिले दोन्ही सामने भारताने जिंकले असून 2-0ने आघाडी घेतली आहे. अशात मालिकेतील तिसरा सामना निसर्गाने नटलेल्या गुवाहाटी येथील बारसपारा क्रिकेट स्टेडिअम येथे मंगळवारी (दि. 28 नोव्हेंबर) रोजी खेळला जाणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ विजयाची हॅट्रिक करण्याचा प्रयत्न करेल. तसेच, ऑस्ट्रेलिया ही मालिका गमावण्यापासून वाचण्याचा प्रयत्न करेल.
गुवाहाटीचे हवामान
आतापर्यंत खेळल्या गेलेल्या मालिकेतील दोन सामन्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. तसेच, सामन्यापूर्वी दोन्ही ठिकाणी पाऊसही झाला होता. मात्र, तिसऱ्या सामन्यात गुवाहाटीचे हवामान स्वच्छ असणार आहे. सामन्याच्या दिवशी इथे पावसाची शक्यता नाहीये. पूर्ण दिवस हवामान स्वच्छ असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे चाहत्यांना हा सामना पाहण्याचा आनंद लुटता येईल. हाती आलेल्या माहितीनुसार, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा टी20 सामना (India vs Australia 3rd T20I) पाहण्यासाठी तब्बल 40 हजारांहून अधिक प्रेक्षक स्टेडिअममध्ये हजेरी लावू शकतात.
गुवाहाटीची खेळपट्टी
गुवाहाटीची खेळपट्टी (Guwahati Pitch) नेहमीच फलंदाजांसाठी फायदेशीर राहिली आहे. अशात तिसऱ्या टी20 सामन्यात पुन्हा एकदा दोन्ही संघांकडून शानदार फलंदाजी पाहायला मिळू शकते. मागील 2 टी20 सामन्यांबद्दल बोलायचं झालं, तर दोन्ही सामन्यात भारतीय संघाने 200 पेक्षा जास्त धावसंख्या उभारली आहे. अशात, तिसऱ्या सामन्यातही भारतीय संघाकडून अशाच प्रदर्शनाची अपेक्षा असेल. या मैदानावर आतापर्यंत 6 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले गेले आहेत, ज्यातील प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 3, तर आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या संघाने 3 सामने जिंकले आहेत.
कुठे पाहायचा सामना?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी 7 वाजता सुरुवात होईल. त्यापूर्वी नाणेफेक 6.30 वाजता होईल. हा सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 आणि कलर्स सिनेप्लेक्स या चॅनेलवर पाहता येईल. तसेच, जिओ सिनेमा ऍपवरही सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल. (ind vs aus 3rd t20 match preview pitch report barsapara cricket stadium guwahati read)
हेही वाचा-
चॅम्पियन चावला! क्रिकेट कारकिर्दीत पूर्ण केल्या 1000 विकेट्स, 34 व्या वर्षीच गाठला मैलाचा दगड
VIDEO: मुंबई इंडियन्समध्ये परतल्यानंतर हार्दिक भलताच खुश, चेहऱ्यावर ओसांडून वाहतोय आनंद