भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील अंतिम सामना मंगळवारी (८ डिसेंबर) रोजी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. याआधीच, मालिकेत २-० अशी विजय आघाडी घेणारा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला ‘क्लीन स्वीप’ करण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, यजमान ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेआधी आत्मविश्वास मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसून येईल.
भारतीय संघात होऊ शकतात काही बदल
भारतीय कर्णधार विराट कोहली शक्यतो विजयी समीकरण बदलण्यात विश्वास ठेवत नाही. मात्र, ऑस्ट्रेलियाला ‘क्लीन स्वीप’ करण्याच्या उद्देशाने भारतीय संघात काही बदल केले जाऊ शकतात. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर व वेगवान गोलंदाज दीपक चाहर यांना वगळून, जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी या अनुभवी वेगवान गोलंदाजांना संधी दिली जाऊ शकते. पहिल्या दोन सामन्यात संमिश्र कामगिरी केलेल्या संजू सॅमसनला संघ व्यवस्थापन आणखी एक संधी देण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलिया संघ विजयासाठी करेल प्रयत्न
वनडे मालिकेत विजय मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाचा आत्मविश्वास दुणावला होता. मात्र, टी२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर मात करत, मालिकेवर कब्जा केला. त्यामुळे, अखेरच्या सामन्यात सन्मानासाठी खेळणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघात काही महत्त्वपूर्ण बदल करेल.
दुसऱ्या सामन्याला मुकलेला नियमित कर्णधार ऍरॉन फिंच या सामन्यात पुनरागमन करू शकतो. त्यामुळे, डार्सी शॉर्टला संघाबाहेर बसावे लागू शकते. ऑस्ट्रेलियाच्या मध्य फळीत बदल होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. फिरकीपटू ऍडम झाम्पा व वेगवान गोलंदाज सीन ऍबॉट यांच्याऐवजी अनुभवी फिरकीपटू नॅथन लायन व वनडे मालिकेतील सर्वात यशस्वी ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरलेल्या जॉश हेजलवूडला संधी मिळू शकते. हे दोन्ही खेळाडू यानंतर कसोटी मालिकेत खेळणार आहेत.
ऑस्ट्रेलियाची संभावित प्लेईंग इलेव्हन:
ऍरॉन फिंच (कर्णधार), मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), स्टीव स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मोझेस हेन्रीक्स, मार्कस स्टॉयनिस, डॅनियल सॅम्स, एँण्ड्रू टाय, मिचेल स्वेप्सन, नॅथन लायन, जॉश हेजलवूड
भारताची संभावित प्लेईंग इलेव्हन:
शिखर धवन, केएल राहुल (यष्टीरक्षक), विराट कोहली (कर्णधार), संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, टी नटराजन, युझवेंद्र चहल
महत्त्वाच्या बातम्या-
…म्हणून विराट सलग सोडतोय झेल; माजी भारतीय फलंदाजाने सांगितले कारण
‘मी माझ्या चुकांमधून शिकलो’, विजयाचा नायक ठरलेल्या पंड्याचे मोठे वक्तव्य
हार्दिक पंड्यापेक्षा ‘हा’ खेळाडू सामनावीर पुरस्काराचा खरा मानकरी, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे मत
ट्रेंडिंग लेख-
भारताकडून २०२० मध्ये वनडे सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे ३ खेळाडू; पंड्या ‘या’ क्रमांकावर
आयपीएलमध्ये अवघ्या ६३ चेंडूत १२० धावा फटकावणारा पॉल वॉल्थटी आता आहे तरी कुठे?
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग






