गुरुवारपासून (दि. 9 मार्च) अहमदाबाद येथे बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील अखेरचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांना घाम फोडत अर्धशतकी भागीदारी केली होती. मात्र, त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी दम दाखवत पाहुण्या संघाला पहिला धक्का दिला. हा धक्का देण्याचं काम आर अश्विन याने केले. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
शॉट मारण्याच्या प्रयत्नात ट्रेविस हेड झेलबाद
जेव्हाही भारतीय संघ अडचणीत असतो, तेव्हा आर अश्विन (R Ashwin) मैदानावर येत संघाला यश मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलतो. यावेळीही त्याने असेच काहीसे केले. अहमदाबाद कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ट्रेविस हेड (Travis Head) भारतीय गोलंदाजांविरुद्ध बॅटमधून धावांचा पाऊस पाडत होता. मात्र, अश्विनने त्याच्या गाडीला ब्रेक लावला.
https://twitter.com/_Alone_1820/status/1633697707293564928?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1633697707293564928%7Ctwgr%5Eee5a65bc5c830ecc569e60c8f3778ec8e17665a3%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news24online.com%2Fsports%2Fcricket%2Find-vs-aus-travis-head-out-on-ravichandaran-ashwin-magic-ball-ravindra-jadeja-catch-watch-video-sid%2F174765%2F
ऑस्ट्रेलियाच्या डावातील 16वे षटक अश्विन टाकत होता. यावेळी त्याने येताक्षणीच हेडला त्रास देण्यास सुरुवात केली. तिसऱ्या चेंडूवर हेडला शॉट मारताना पाहून अश्विनने धिम्या गतीचा चेंडू टाकला, ज्यामुळे चेंडू त्याच्या बॅटवर व्यवस्थित लागला नाही. त्यामुळे चेंडू 30 यार्डात उभ्या असलेल्या रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याच्या हातात गेला. त्यामुळे हेडला तंबूत परतावे लागले. हेडने यावेळी 44 चेंडूत 32 धावा केल्या. या धावा करताना त्याने 7 चौकारांचा पाऊस पाडला.
Opening breakthrough for #TeamIndia!@ashwinravi99 removes Travis Head to get the first wicket of the innings👌
Follow the match ▶️ https://t.co/8DPghkx0DE…#INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/aYUUOHfy4r
— BCCI (@BCCI) March 9, 2023
भारतीय संघ मालिकेत 2-1ने आघाडीवर
या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा (Rohit Sharma) करत आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याच्या खांद्यावर आहे. या मालिकेत भारतीय संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. संघ मालिकेत 2-1ने आघाडीवर आहे. अशात या सामन्यात भारतीय संघ विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. कारण, या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतासाठी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मार्ग मोकळा होणार आहे. (ind vs aus 3rd test travis head out on ravichandaran ashwin magic ball ravindra jadeja catch see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘टीम इंडियाला भासतेय पंतची उणीव’, केएस भरतच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे नेटकऱ्यांना आठवला रिषभ, Video
मोठी बातमी! गुजरातची कर्णधार WPLमधून बाहेर, स्टार खेळाडूने घेतली जागा; नेतृत्व भारतीय क्रिकेटरकडे