भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या मेलबर्न कसोटीचा चौथा दिवस खूपच नाट्यमय झाला. एकीकडे भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना क्रीझवर टिकू न देऊन आश्चर्यकारक कामगिरी केली. तर दुसरीकडे कांगारू संघाच्या टेल एंडर्सनी भारतीय गोलंदाजांना त्रास दिला. दिवसाच्या शेवटच्या षटकात बुमराहने लायनला बाद करून ऑस्ट्रेलियाला ऑलआऊट दिला होता. पण अचानक परिस्थिती अशा प्रकारे उलटले की संपूर्ण भारतीय कॅम्प दु:खी झाला.
भारताने 65 व्या षटकात 173 धावांवर ऑस्ट्रेलियाची 9वी विकेट घेतली होती. परंतु त्यानंतर 82 व्या षटकानंतर दिवसाचा खेळ संपला आणि ऑस्ट्रेलियन संघ ऑलआऊट झाला नाही. लियॉन आणि बोलंड यांनी शेवटच्या म्हणजेच 10व्या विकेटसाठी 55* (110 चेंडू) धावांची भागीदारी केली. ज्यामुळे भारतीय गोलंदाजांना सर्वात जास्त त्रास झाला.
जसप्रीत बुमराहने चौथ्या दिवसाचे शेवटचे षटक भारतासाठी टाकले. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर बुमराहने नॅथन लायनला स्लिपमध्ये बाद केले. विकेट पडल्यानंतर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. दरम्यान, अंपायरकडून नो बॉलचा सिग्नल आला, जे पाहून संपूर्ण भारतीय कॅम्प दु:खी झाला. अशा प्रकारे चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघ ऑलआऊट होऊ शकला नाही.
In the last over of Day Four, Jasprit Bumrah thought he taken the final wicket.
But it was called a no-ball. #AUSvIND pic.twitter.com/Yc9kjO3bVc
— cricket.com.au (@cricketcomau) December 29, 2024
दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाने 173 धावांवर 9 विकेट गमावल्या होत्या. यानंतर नॅथन लायन आणि स्कॉट बोलँड क्रीजवर उपस्थित होते. येथून कांगारू संघाला 200 धावांपर्यंत मजल मारता येणार नाही असे वाटत होते. पण लायन आणि बोलँडच्या जोडीने शानदार खेळी करत संघाने 228/9 धावांपर्यंत मजल मारली. दिवसअखेरीस लायन 41 तर स्काॅट बोलँड 10 धावा करून परतला. दिवसअखेर भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 बळी घेतले होते.
हेही वाचा-
टीम इंडियासाठी 300 पेक्षा अधिक धावांचं लक्ष्य मोठं नाही, यापूर्वीही केले आहेत अनेक चमत्कार
‘मास्टरमाइंड’ कोहलीनं मिळवून दिली सिराजला विकेट, एक सल्ल्यानं सामन्याचं चित्र पालटलं!
‘टी20 क्रिकेटर ऑफ द इयर’साठी हा भारतीय खेळाडू शाॅर्टलिस्ट, बुमराह-हार्दिकचं नाव नाही!