भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 4 सामन्यांची कसोटी मालिका सध्या 2-1 अशी आहे. यातील पहिले दोन सामने भारताने जिंकले आहेत, तर तिसऱ्या कसोटीत भारताला 9 विकेट्सने पराभूत व्हावे लागले होते. अशात मालिकेतील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना अहमदाबाद येथे खेळला जात आहे. उभय संघातील चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, भारतीय संघाने 300 धावांचा टप्पाही पार केला आहे.
भारतीय संघाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत धावफलकावर 3 विकेट्स गमावत 289 धावा केल्या होत्या. यावेळी विराट कोहली (Virat Kohli) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) अनुक्रमे 59 आणि 16 धावांवर नाबाद राहिले होते. त्यानंतर आता रविवारी (दि. 12 मार्च) चौथ्या दिवसाची सुरुवात झाली. यावेळी भारताने 3 षटके खेळताच म्हणजेच डावातील 102व्या षटकानंतर 300 धावांचा आकडा शिवला. यावेळी विराट 64, तर जडेजा 22 धावा केल्या. यावेळी दोघांमध्ये 55 धावांची भागीदारी झाली. मात्र, पुढे भारताला 309 धावांवरच चौथा धक्का बसला. विराट आणि जडेजाची भागीदारी 64 धावांवर तुटली. जडेजा यावेळी वैयक्तिक 28 धावांवर बाद झाला. त्याला टॉड मर्फी याने उस्मान ख्वाजा याच्या हातून झेलबाद केले.
300 up for #TeamIndia.@imVkohli & @imjadeja going strong with a 55-run partnership.
Live – https://t.co/8DPghkwsO6 #INDvAUS @mastercardindia pic.twitter.com/bSEvojUTmi
— BCCI (@BCCI) March 12, 2023
4TH Test. WICKET! 106.6: Ravindra Jadeja 28(84) ct Usman Khawaja b Todd Murphy, India 309/4 https://t.co/KjJudHw47Q #INDvAUS @mastercardindia
— BCCI (@BCCI) March 12, 2023
भारतासाठी शुबमनचे शतक
भारताच्या पहिल्या डावात शुबमन गिल (Shubman Gill) याने पाहुण्या संघाच्या गोलंदाजांना घाम फोडत शतक साजरे केले. त्याने यावेळी तब्बल 235 चेंडूंचा सामना केला आणि 128 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 1 षटकार आणि 12 चौकारांचा पाऊस पाडला. त्याच्या या शतकामुळे भारताला चांगली लय मिळाली. त्याने यादरम्यान आधी रोहित शर्मा याच्यासोबत पहिल्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी रचली. तसेच, दुसऱ्या विकेटसाठी चेतेश्वर पुजारा याच्यासोबत 113 धावांची भागीदारी केली. विशेष म्हणजे, पुजारा (42) बाद झाल्यानंतर त्याने विराट कोहली याच्यासोबत 58 धावांची भागीदारी रचली.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी 480 धावांचा डोंगर उभारला. एवढे मोठे आव्हान उभे करताना त्यांच्या 2 खेळाडूंनी शतक साजरे केले. त्यात उस्मान ख्वाजा आणि कॅमरून ग्रीन यांचा समावेश आहे. ख्वाजाने 422 चेंडू खेळून 180 धावा चोपल्या. त्यात 21 चौकारांचाही समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त ग्रीनने 170 चेंडू खेळून 114 धावा केल्या. या धावा करताना त्याने 18 चौकार मारले. (IND vs AUS 4th Test 4th day india complete 300 runs but sacrifies 4th wicket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कर्णधार स्मिथला विराटच्या बॅटवर संशय? ड्रिंक्स ब्रेकदरम्यान धावत येऊन तपासली बॅट, फोटो व्हायरल
वन वुमन शो! 10 चौकार आणि 5 षटकारांसह शफालीने मैदानावर आणले वादळ