IND vs AUS 5th T20I: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील 4 सामने पार पडले आहेत. यातील पहिले दोन सामने भारतीय संघाने जिंकले होते. तसेच, तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विजय मिळवण्यात यशस्वी झाली होती. मात्र, चौथ्या सामन्यात भारतीय संघाने पुन्हा लय मिळवत सामना खिशात घातला. आता भारतीय संघाच्या नजरा विजयासोबत मालिकेचा शेवट करण्यावर असणार आहे. तसेच, ऑस्ट्रेलिया पुनरागमन करत दुसरा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल. चला तर, पाचव्या सामन्याविषयी सर्व माहिती जाणून घेऊयात…
सामन्याविषयी थोडक्यात
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील पाचवा सामना बंगळुरू येथे पार पडणार आहे. हा सामना रविवारी (दि. 3 डिसेंबर) रोजी खेळला जाईल. दोन्ही संघ एम चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडिअमवर भिडतील. या सामन्याला सायंकाळी 7 वाजता सुरुवात होईल. त्यापूर्वी 6.30 वाजता नाणेफेक होईल. या मैदानाची बाऊंड्री लहान आणि खेळपट्टी सपाट असल्यामुळे, सामना मोठ्या धावसंख्येचा पाहायला मिळू शकतो. मालिकेतील चौथा सामना सोडला, तर इतर सर्व सामन्यात मोठी धावसंख्या झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
एम चिन्नास्वामी स्टेडिअमचे आकडे
बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअम (M Chinnaswamy Stadium) येथे आतापर्यंत 8 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले गेले आहेत. येथील सरासरी धावसंख्या 139 राहिली आहे. तसेच, या 8 सामन्यात फक्त 2 वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला विजय मिळवता आला आहे. तसेच, 5 सामने आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकला आहे. अशात या सामन्यात नाणेफेकही महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
टी20 मालिकेसाठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, यशस्वी जयसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार, दीपर चाहर.
टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ
मॅथ्यू वेड (कर्णधार), जेसन बेहरेन्डॉर्फ, टीम डेविड, बेन ड्वारशुइस, नेथन एलिस, ख्रिस ग्रीन, ऍरॉन हार्डी, ट्रेविस हेड, बेन मॅकडर्मोट, जोश फिलिप, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, केन रिचर्डसन. (ind vs aus 5th t20i match m chinnaswamy stadium bengaluru know all about march)
हेही वाचा-
द्रविडची नाळ मातीशी जोडलेली! पत्नीसोबत पायऱ्यांवर बसून पाहिला लेकाचा क्रिकेट सामना, फोटो जोरात व्हायरल
IND vs AUS: बॅाल लागूनही पंचांनीच मागितली माफी, भारतीय क्रिकेटर जीतेश शर्माने मारला होता शॅाट