---Advertisement---

IND vs AUS: बॅाल लागूनही पंचांनीच मागितली माफी, भारतीय क्रिकेटर जीतेश शर्माने मारला होता शॅाट

Jitesh Sharma
---Advertisement---

पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने मालिकेवर कब्जा केला आहे. या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 20 षटकांत 9 विकेट्स गमावून 174 धावा केल्या आणि त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कांगारू संघाला 154 धावांत गुंडाळत विजय प्राप्त केला.

भारतीय संघाच्या या विजयात अनेक खेळाडू बॉल आणि बॅटने चमकले. यामध्ये जितेश शर्मा (Jitesh Sharma) याच्या नावाचाही समावेश आहे. या मालिकेत जितेशला पहिल्यांदाच संधी मिळाली. त्याने 19 चेंडूत 35 धावा केल्या. जितेशने या खेळीत तीन षटकार आणि एक चौकार लगावला. या काळात त्याने इतर अनेक आकर्षक शॉट्स केले. जितेशची ही स्फोटक फलंदाजी पाहून ऑस्ट्रेलियन गोलंदाजही चांगलेच घाबरलेले पाहायला मिळाले. केवळ गोलंदाजच नाही तर पंचही यावेळी भिले होते. खरं तर डावाच्या 15व्या षटकातील तिसर्‍या चेंडूवर जितेशने इतका जबरदस्त फटका मारला की तो थेट अंपायरच्या हाताला लागला. त्यामुळे चांगलीच खळबळ माजली, परंतु यात कोणतीही हानी झालेली नाही. परंतु या सगळ्या नाट्यमय प्रकारानंतर अंपायरनेच जितेश शर्माची माफी मागितली.

https://twitter.com/me_sanjureddy/status/1730597665338282423?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1730597665338282423%7Ctwgr%5Edd2adc314e2ab6d70ac7dc55c3e5207447acc4ac%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Fsports%2Fcricket%2Fcricket-news%2Fjitesh-sharma-hit-such-a-shot-ball-hit-umpire-like-bullet-a-major-accident-was-averted%2Farticleshow%2F105668747.cms

जितेशने मारलेल्या शाॅटचा वेग इतका होता की तो शरीराच्या कोणत्याही वरच्या भागाला लागला असता तर मोठी दुर्घटना घडू शकली असती, मात्र तो टळला. त्यानंतर जितेशचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

यशस्वी जयसवाल आणि ऋतुराज गायकवाड यांच्या दमदार सुरुवातीनंतर भारतीय संघाने मध्यंतरी दोन विकेट झटपट गमावल्या, पण रिंकू सिंग याने पुन्हा एकदा जबाबदारी स्वीकारली आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजांविरुद्ध जोरदार फलंदाजी केली. रिंकूने 29 चेंडूत 46 धावा केल्या. या खेळीत रिंकूने 4 चौकार आणि 2 षटकार मारले. (The umpire asked for forgiveness despite the ball, Indian cricketer Jitesh Sharma had hit the shot)

महत्वाच्या बातम्या

बॅटिंग अशी करा की, दिग्गजही खुश होईल! जितेश शर्माचा झंझावात पाहून माजी क्रिकेटर म्हणाला, ‘खूपच जबरदस्त…’
उपकर्णधार असलेला रहाणे आता टीमच्या बाहेर कसा? दिग्गज क्रिकेटपटूचा बोर्डाला सवाल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---