सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात 622 धावांचा डोंगर उभारला आहे. याच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाखेर पहिल्या डावात 6 गडी गमावत 236 धावा केल्या आहेत. यामुळे ऑस्ट्रेलिया अजुनही 386 धावांनी पिछाडीवर आहे.
भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे हा नेहमीच त्याच्या स्लिपमधील उत्कृष्ठ क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. या सामन्यातही त्याने तिसऱ्या दिवसाच्या खेळात असेच उत्तम क्षेत्ररक्षण करताना ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशानचा अफलातून झेल पकडला.
या सामन्यात 52वे षटक टाकायला आलेल्या मोहमद शमीने तीन चेंडू टाकल्यावर कर्णधार विराट कोहलीने क्षेत्ररक्षण बदलले होते. यानंतर टाकलेल्या चेंडूवर लाबुशानने ड्राईव शॉट मारला असताना मिडविकेटवर उभ्या असलेल्या रहाणेने चपळाईने तो चेंडू पकडला. रहाणेच्या या कामगिरीने आश्चर्यचकित झालेल्या लाबुशानला तो बाद झाल्याचा विश्वासच बसत नव्हता.
लाबुशानचा झेल पकडण्याआधी रहाणे थोडा मागे उभा होता. कोहलीने क्षेत्ररक्षण बदलताना त्याला पुढे येण्यास सांगितले होते. त्यामुळे या विकेटमध्ये कोहलीचे पण तेवढेच योगदान आहे.
लाबुशानला या सामन्यात शेवटच्या क्षणाला ऑस्ट्रेलिया संघात जागा दिली गेली होती. यावेळी त्याने संयमाने फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांना चांगलेच त्रासावून सोडले होते. मात्र रहाणने त्याचा झेल पकडत त्याचा अडथळा दूर केला. त्याने या सामन्यात 7 चौकाराच्या मदतीने 38 धावा केल्या आहेत.
A ripper from Rahane for another breakthrough on day three.#AUSvIND | @bet365_aus pic.twitter.com/AloLI08vB9
— cricket.com.au (@cricketcomau) January 5, 2019
महत्त्वाच्या बातम्या-
–ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३ विकेट्स घेणाऱ्या कुलदीपसाठी ऑस्ट्रेलियाच्याच दिग्गजाचा सल्ला ठरला मोलाचा
–कसोटीत केवळ ९ शतकं करणाऱ्या त्या फलंदाजाची सगळीच शतकं आहेत खास
–१९ तासांत ४ लाख लाईक्स मिळालेला पंतचा तो फोटो पाहिला का?