भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी भारताला 150 धावांत गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियाने अवघ्या 67 धावांत सात विकेट्स गमावल्या होत्या. तर आज (23 नोव्हेंबर) रोजी दुसऱ्या दिवशी खेळताना यजमान संघ 104 धावांत सर्वबाद झाला आहे. अर्थातच भारतीय संघ आता 46 धावांनी आघाडीवर आहे.
खेळपट्टीवर गवत असूनही बुमराहने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले कारण या विकेटवर गोलंदाजांना अतिरिक्त उसळी मिळण्याची शक्यता होती. त्याप्रमाणे पाहायला देखील मिळाले. भारताच्या युवा आणि अनुभवी फलंदाजांना यजमान गोलंदाजांचा सामना करता आला नाही. परिणामी टीम इंडिया 150 धावांवर ऑलआऊट झाली. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा टिकाव लागला नाही. भारतीय संघाप्रमाणे ऑस्ट्रेलियन फलंदाज या खेळपट्टीवर झगडताना पाहायला मिळाले. टीम इंडियाकडून वेगवान गोलंदाजांकडून शानदार गोलंदाजी पाहायला मिळाले. ज्यामध्ये कर्णधार जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या, तर हर्षित राणाने 3 आणि मोहम्मद सिराजने 2 बळी घेतल्या. फलंदाजीत यजमान संघाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 26 धावा केल्या.
Innings Break!
Australia have been bowled out for 104 runs and #TeamIndia secure a 46-run lead. Captain @Jaspritbumrah93 leads by example taking 5 wickets, while debutant Harshit Rana gets 3 and @mdsirajofficial has 2.
It is time for Lunch on Day 2 and post that the Indian… pic.twitter.com/eryt7KsGKf
— BCCI (@BCCI) November 23, 2024
तत्तपूर्वी, भारतीय संघाने पहिल्या डावात खेळताना सर्व विकेट गमावून 150 धावा केल्या. ज्यामध्ये नवख्या नितीश रेड्डीने सर्वाधिक 41 धाव केल्या. त्याच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघ 150 धावांचा टप्पा गाठण्यास यशस्वी ठरला. शिवाय विकेटकीपर रिषभ पंतने देखील मोलाची खेळी खेळली. त्याने 78 चेंडूत 37 धावा केल्या. नितीशकुमार रेड्डी आणि रिषभ पंतने संघासाठी निर्णायक 48 धावांची भागीदारी केली.
हेही वाचा-
पर्थमध्ये बुमराहची जादू, सेना देशांमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच, कपिल देवचा महान विक्रम मोडीत
SMAT 2024; अभिषेक शर्मापासून मोहम्मद शमीपर्यंत स्टार खेळाडू ॲक्शनमध्ये, या ठिकाणी पाहा लाईव्ह सामना
जॉश हेझलवुडने चक्क इतक्यावेळा विराट कोहलीला बाद केले, किंगचा लाजिरवाणा रेकाॅर्ड!