भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा टी-20 सामना शुक्रवारी (1 डिसेंबर) रायपूरमध्ये आयोजित केला गेला. नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. निर्धारित 20 षटकांमध्ये भारताला 9 विकेट्सच्या नुकसानावर 174 धावांपर्यंत मजल मारता आली. विजयासाठी ऑस्ट्रेलियासमोर 174 धावांचे आव्हान ठेवले गेले.
भारतीय संघाचे सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या सामन्यात मोठी खेळी करू शकले नाहीत. जयसवालने 37, तर ऋतुराजने 32 धावा केल्या. श्रेयस अय्यर या सामन्यात पुनरागमन करत होता. पण त्याने अवघ्या 8 धावा करून विकेट गमावली. चौथ्या क्रमांकावर कर्णधार सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला, पण दोन चेंडूत एक धाव करून तोही मागारी परतला. रिंकू सिंग संघासाठी पुन्हा एकदा महत्वपूर्ण खेळी करू शकला.
Innings break!
Rinku Singh top-scores with 46 as #TeamIndia set a ???? of 175 ????
Second innings coming up shortly ⏳
Scorecard ▶️ https://t.co/iGmZmBsSDt#TeamIndia | #INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/4q17vMLbBi
— BCCI (@BCCI) December 1, 2023
रिंकूने अवघ्या 29 चेंडूत 46 धावांची खेळी केली. जितेश शर्मा यानेही 35 धावाचे योगदान दिले. तर अक्षर पटेल आणि दीपक चाहर यांनी शुन्य धावांवर विकेट्स गमावल्या. रवी बिश्नोई याने 4, तर आवेश खान याने 1* धाव केली. ऑस्ट्रेलियासाठी बेन द्वारशुइस याने 4 षटकात 40 धावा खर्च करून सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तनवीर सांघा आणि जेसन हेरनडॉर्फ यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. ऍरॉन हार्डी यानेही एक विकेट घेतली. (IND vs AUS Australia needs 175 runs to level the series 2-2)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – यशस्वी जयसवाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, जितेश शर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, दीपक चहर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार.
ऑस्ट्रेलिया – जोश फिलिप, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, अॅरॉन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, मॅथ्यू वेड, बेन द्वारशुइस, ख्रिस ग्रीन, जेसन बेहरेनडॉर्फ, तनवीर संघा.
महत्वाच्या बातम्या –
कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान टीम ऑस्ट्रेलियात दाखल, विमानतळावर आली खेळाडूंवर मान खाली घालण्याची वेळ
ऑस्ट्रेलियाने जिंकली निर्णायक सामन्याची नाणेफेक! चार महत्वाच्या बदलांसह भारत करणार प्रथम…






