पाकिस्तान क्रिकेट संघ विश्वचषक 2023च्या उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचू शकला नाही. ग्रुप स्टेजच्या शेवटी पाकिस्तान संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर होता. आता संघाला आपली पुढची मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी प्रकारात खेळायची आहे. तीन सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तान संघ ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला आहे. पण ऑस्ट्रेलियात पोहोचल्याबरोबर त्यांच्योसोबत मान खाली घालायला लावणारा प्रकार घटला आहे.
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान (AUS vs PAK) यांच्यातील ही कसोटी मालिका तीन सामन्यांची असेल. पहिला सामना 14 डिसेंबर रोजी पर्थवर आयोजित केला गेला आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना 26 डिसेंबर रोजी मेलबर्न, तर तिसरा सामना 3 जानेवारी रोजी सिडनीमध्ये आयोजित केला गेला आहे. तत्पूर्वी 6 डिसेंबरपासून पाकिस्तान विरुद्ध पीएल 11 यांच्यात चार दिवसांचा सराव सामना आयोजित केला गेला आहे.
पाकिस्तान संघ (Pakistan Cricket Team) शुक्रवारी (1 डिसेंबर) ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला. पण विमानतळावर उतरल्यानंतर त्यांच्यावर मान खाली घालण्याची वेळ आली. कारण खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या स्वागतासाठी विमानतळावर कोणीच उफस्थित नव्हते. पाकिस्तान दुतावासातील अधिकारी किंवा क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून आलेले अधिकारी यावेळी खेळाडूंच्या स्वागतासाठी उपस्थित असेणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. त्यातही खेळाडूंनी आपले क्रिकेट किट आणि इतर सामना स्वतः ट्रकमध्ये चढवले.
Pak Team Reached Australia????
Rizwan ne sab ka Saman Load keya????
So humble and down to earth personality he has ❤#PakistanCricketTeam #PAKvsAUS #AUSvPAK #BabarAzam???? #PakistanCricket #BabarAzam #BabarAzamIsMyCaptain pic.twitter.com/jq2zWAtvOM— Abdullah Zafar (@Arain_417) December 1, 2023
पाकिस्ताचा क्रिकेटचा 18 खेलाडूंचा संघ आणि 17 सदस्यीय सपोर्ट स्टाफ गुरुवारी (30 नोव्हेंबर) लाहोरमधून ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला. लाहोरमधून संघ दुबईमध्ये पोहोचला. दुबईमध्ये काही वेळ थांबल्यानंतर खेळाडूंनी आराम केला आणि तिथून संघ ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला. बाबर आझम याने कर्णधारपद सोडल्यानंतर कसोटी मालिकेत शान मसूद पहिल्यांदाच नियमित कर्णधार म्हणून पाकिस्तानचे नेतृत्व करताना दिसणार आहे. 2019 नंतर हा पाकिस्तानचा पहिला ऑस्ट्रेलिया दौरा आहे. (After reaching Australia, the Pakistan team had to load their luggage into the truck themselves)
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाने जिंकली निर्णायक सामन्याची नाणेफेक! चार महत्वाच्या बदलांसह भारत करणार प्रथम…
विजय हजारे ट्रॉफीत गोलंदाजांवर जोरात बसरला कार्तिक! ठोकले 13 चौकार आणि 4 जबरदस्त षटकार