भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका मंगळवार 20 सप्टेंबर पासून खेळली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना मोहालीमध्ये सुरू होणार असून ऑस्ट्रेलियन संघ भारतात दाखल झाला आहे. पाहुण्या संघाने भारतीय संघाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी सरावाला देखील सुरुवात केली आहे. सोशल मीडिया एक खास व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामधून संघाच्या सरावाला सुरुवात झाल्याचे समजते.
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला टी-20 सामना मोहालीमध्ये खेळला जाणार असून पंजाब क्रिकेट असोसिएशनने त्याआधी हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या बॅग आणि ड्रेसिंग रूममधील काही दृश्य दिसत आहेत. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ (Australia Cricket Team) मोहालीतील परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. ऑस्ट्रेलियन संघ या मालिकेसाठी तयार असला, तरी त्यांच्यासाठी भारताचे आव्हान सोपे नसेल. त्यांचाया दिग्गज सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर कामाच्या तानामुळे या मालिकेत खेळत नाहीये. कॅमरून ग्रीन वॉर्नरच्या जागी खेळणार आहे. तसेच मिचेल स्टार्क, मिचेल मार्श आणि मार्कस स्टॉयनिस या दिग्गजांची देखील कमी ऑस्ट्रेलियाला जाणवणार आहे. हे सर्वजन दुखापतीमुळे या मालिकेत खेळणार नाहीत.
.@CricketAus have arrived 😍
Excitement level ✅ #IndvsAus @gulzarchahal #1stT20I #pca #pcanews #punjab #cricket #teamindia #indiancricketteam #punjabcricketnews #cricketnews #gulzarinderchahal #president #fans #cricketfans pic.twitter.com/6LskXmPYS7— Punjab Cricket Association (@pcacricket) September 17, 2022
दुसरीकडे भारतीय संघ मात्र त्याच्या सर्वोत्तम संघासह ही मालिका खेळेल. भारताच्या अनेक दिग्गज खेळाडूंना मागच्या काही महितन्यांमध्ये विश्रांती मिळाली आहे. अशात कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याकडे सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन निवडण्यासाठी पर्याय उपस्थित असतील. मालिकेतील पहिला सामना 20 सप्टेंबरला, तर दुसरा सामना 23 सप्टेंबर रोजी नागपुरमध्ये खेळला जाईल. तिसरा आणि शेवटचा सामना 25 सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये खेळला जाईल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह.
भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवडलेला ऑस्ट्रेलिया संघ-
आरोन फिंच (कर्णधार), सीन एबोट, एश्टन एगर, पैट कमिंस, टिम डेविड, नाथन एलिस, कैमरून ग्रीन, जोश हेजलवुड, जोश इंग्लिस, ग्लेन मैक्सवेल, केन रिचर्डसन, केन रिचर्डसन,डेनियन सेम्स, स्टीव स्मिथ, मैथ्यू वेड, एडम जम्पा.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –