भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेला येत्या 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड हा पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे तो नागपूर कसोटीत खेळू शकणार नाही. त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये सामील केले जाऊ शकते.
माध्यमांतील वृत्तांनुसार, जोश हेजलवूड (Josh Hazlewood) हा दुखापतीतून सावरला नाहीये. त्यामुळे तो भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडू शकतो. इतकेच नाही, तर दिल्लीत होणाऱ्या दुसऱ्या कसोटीतही त्याच्या खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे. जोश हेजलवूड याने बंगळुरू येथील एलूरमध्ये झालेल्या सराव सत्रातही भाग घेतला नाही. यादरम्यान तो फक्त संघसहकाऱ्यांना मदत करताना दिसला. पहिल्या सामन्यात हेजलवूडच्या जागी स्कॉट बोलँड (Scott Boland) याला संधी मिळू शकते. तो पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाकडून कसोटी खेळू शकतो.
ऑस्ट्रेलियासाठी आणखी एक वाईट बातमी अशी आहे की, दुखापतीमुले मिचेल स्टार्क हा आधीच पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे. हे दोन्ही गोलंदाज ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजी फळीचा कणा म्हणून ओळखले जातात. अशात या दोघांच्या अनुपस्थितीमुळे ऑस्ट्रेलिया संकटात येऊ शकते.
याव्यतिरिक्त कॅमरून ग्रीन हादेखील बोटाच्या दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात गोलंदाजी करणार नाही. जर त्याला खेळण्याची संधी दिली, तर तो फक्त फलंदाजी करताना दिसेल. हेजलवूडला मागील महिन्यात सिडनी कसोटीदरम्यान दुखापत झाली होती. हेजलवूडने एलूर येथे ऑस्ट्रेलियाच्या शिबिरातही पूर्णपणे भाग घेतला नाही.
मागच्या वेळी मालिकेचे सर्व सामने खेळलेला हेजलवूड
जोश हेजलवूड याने 2017च्या कसोटी मालिकेत चारही कसोटी सामन्यात संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यादरम्यान त्याने सर्व सामन्यात विकेट्स घेतल्या होत्या. त्याने दुसऱ्या कसोटीत सर्वोत्तम कामगिरी केली होती. त्याने फिरकीसाठी उपयुक्त असणाऱ्या खेळपट्टीवर त्या डावात 6 विकेट्स घेत भारतीयांना हैराण केले होते. विशेष म्हणजे, त्याने अव्वल 4 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. त्यात चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांचाही समावेश होता. (ind vs aus big blow to australia josh hazlewood out of first test against india this player can get chance)
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा (कसोटी मालिकेचे वेळापत्रक)
पहिला कसोटी सामना- 9 ते 13 फेब्रुवारी, नागपूर
दुसरा कसोटी सामना- 17 ते 21 फेब्रुवारी, दिल्ली
तिसरा कसोटी सामना- 1 ते 5 मार्च, धरमशाला
चौथा कसोटी सामना- 9 ते 13 मार्च, अहमदाबाद
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेव्हा पाकिस्तानचे राष्ट्रपतीही झालेले ‘माही’च्या हेअरस्टाईलचे फॅन, सर्वांसमोर केली होती ‘ही’ खास विनंती
ब्रेकिंग! पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतींना देवाज्ञा, दुबईच्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास






