बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024 चा चौथा कसोटी सामना मेलबर्न येथे खेळला जात आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघानं पहिल्या डावात 9 गडी गमावून 358 धावा केल्या. तिसऱ्या दिवशी नितीश रेड्डीनं शतक तर वॉशिंग्टन सुंदरनं अर्धशतक झळकावले. अशा स्थितीत भारतीय संघाच्या विजयाच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. ऑस्ट्रेलियन संघानं पहिल्या डावात 474 धावा केल्या होत्या. भारतीय संघ अजूनही 116 धावांनी मागे आहे.
‘ॲक्युवेदर’च्या अहवालानुसार, मेलबर्न कसोटीच्या तिसऱ्या दिवशी जवळपास 49 टक्के पाऊस पडण्याची शक्यता होती. मेलबर्नमध्ये शनिवारी पाऊस झाला. अशा स्थितीत सामना काही काळ थांबवावा लागला होता. शेवटी खराब प्रकाश आणि पावसामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ लवकर संपला. अशा परिस्थितीत येत्या दोन दिवसांत मेलबर्नचं हवामान कसं असेल, असे प्रश्न चाहत्यांच्या मनात उठू लागले आहेत.
‘ॲक्युवेदर’च्या अहवालानुसार, रविवार, 29 डिसेंबर रोजी मेलबर्नमध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता नाही. रिपोर्टनुसार, मेलबर्नमध्ये सकाळी 2-3 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. वातावरण 55 टक्के ढगाळ राहील आणि वारे ताशी 20 किमी वेगानं वाहतील. दुपारनंतर आणखी ढग असतील. मात्र, पावसाची शक्यता फारशी नाही. रविवारी, मेलबर्नचं कमाल तापमान 25 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 14 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
बॉक्सिंग डे कसोटीच्या शेवटच्या दिवशी मेलबर्नमध्ये कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 15 अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे. सामन्याच्या शेवटच्या दिवशी पावसाची शक्यता नाही. याशिवाय वारे ताशी 15 किमी वेगानं वाहू शकतात. अशा परिस्थितीत चाहत्यांना शेवटच्या दिवशी संपूर्ण सामना बघायला मिळू शकतो.
हेही वाचा –
नितीश रेड्डीच्या शतकानंतर रवी शास्त्रींना अश्रू आवरेना, कॉमेंट्री बॉक्समधील भावनिक फोटो समोर
नितीश कुमार रेड्डीवर पैशांचा वर्षाव, शतक झळकावताच मिळालं मोठं बक्षीस
नितीश रेड्डीच्या शतकामागे सिराजची भूमिका महत्त्वाची, 99 धावांवर असताना केला चमत्कार