भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी कसोटी ॲडलेडमध्ये खेळली जात आहे. भारताचा पहिला डाव अवघ्या 180 धावांवर आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावात एक मजेशीर घटना घडली, ज्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची सर्वत्र नाचक्की होत आहे.
वास्तविक झालं असं की, ॲडलेडच्या ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दिवस-रात्र कसोटी खेळली जात आहे. ही कसोटी प्रकाशझोतात खेळली जाते. मात्र ॲडलेडच्या मैदानावर वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे एकदा नव्हे तर चक्क दोनदा खेळ थांबवण्यात आला. दोन्ही वेळेस काही सेकंदातच वीज पुरवठा सुरळीत झाला खरा, मात्र त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियावर तोंड लपवण्याची पाळी आली. मैदानावरील लाईट बंद होताच चाहत्यांनी आपापल्या फोनचे फ्लॅश लाइट लावणं सुरू केलं. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
ही घटना ऑस्ट्रेलियाच्या डावादरम्यान 18 व्या षटकात घडली. तेव्हा हर्षित राणा गोलंदाजी करत होता. ओव्हरचा पहिला चेंडू टाकल्यानंतर मैदानात अचानक अंधार पडला, परंतु काही वेळानं उजेड आला. यानंतर हर्षितनं दोन चेंडू टाकले आणि पुन्हा मैदानात अंधार पसरला. यावर हर्षित राणा नाराज दिसला. ऑस्ट्रेलियात जागतिक दर्जाची मैदानं आहेत. त्यामुळे लाईट जाण्याच्या घटना येथे क्वचितच पाहायला मिळतात. लोकांनीही या दुर्मिळ घटनेवरून क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Power cut at Adelaide Oval ????????#INDvsAUS pic.twitter.com/8QLBnmiP2t
— Riccionso (@riccionso) December 6, 2024
ॲडलेड कसोटी सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, पहिल्या दिवसअखेर भारतीय संघाकडे 94 धावांची आघाडी आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया पहिल्या डावात 180 धावा करून ऑलआऊट झाली. प्रत्तुत्तरात, ऑस्ट्रेलियानं 1 गडी गमावून 86 धावा केल्या आहेत. सध्या मॅकस्विनी (38*) आणि मार्नस लाबुशेन (20*) क्रिजवर आहेत. या दोघांमध्ये नाबाद 62 धावांची नाबाद भागीदारी झाली आहे.
हेही वाचा –
भारताला विकेटच मिळेना, ॲडलेड कसोटीवर ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड
बुमराहची कपिल-झहीरच्या स्पेशल क्लबमध्ये एंट्री! यावर्षी अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच गोलंदाज
नितीश रेड्डीला तोड नाही, चक्क रिव्हर्स स्कूप शॉटवर हाणला षटकार! VIDEO एकदा पाहाच






