सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात अहमदाबाद येथे चौथा म्हणजेच मालिकेतील अखेरचा कसोटी सामना खेळला जात आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या चौथ्या सामन्यात भारताने दमदार पुनरागमन केले आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 3 विकेट्स गमावत 289 धावा केल्या. यादरम्यान ‘किंग’ म्हणून ओळखला जाणारा भारतीय विस्फोटक खेळाडू विराट कोहली यानेही अर्धशतक झळकावत संघाच्या धावसंख्येत मोलाची भर घातली. विशेष म्हणजे, सामन्यादरम्यान असे काही पाहायला मिळाले, जिथे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने विराटची बॅट तपासली. यादरम्यानचा फोटो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
स्टीव्ह स्मिथने तपासली विराटची बॅट
झाले असे की, अहमदाबाद कसोटीत जेव्हा विराट कोहली (Virat Kohli) धावांवर खेळला होता, तेव्हा सामना ड्रिंक्स ब्रेकसाठी थांबलेला. त्यानंतर विराटने त्याची बॅट जमिनीवर ठेवून विश्रांती घेतली. यादरम्यान स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) धावत धावत विराटकडे आला आणि त्याची बॅट उचलून तपासू लागला. यावेळी दोघांमध्ये थोडा वेळ चर्चाही झाली. अशात आता विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ (Virat Kohli And Steve Smith) यांचा हा फोटो सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधत आहे.
Steve Smith just loves batting🏏#INDvAUS pic.twitter.com/LXqEILlXoS
— cricket.com.au (@cricketcomau) March 11, 2023
विराट कोहलीचा पराक्रम
खरं तर, विराट कोहली याने तब्बल 14 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर कसोटीत अर्धशतक झळकावले आहे. तो तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 128 चेंडूत 59 धावांवर नाबाद राहिला. यासोबतच त्याच्या नावावर मायदेशात 4000 कसोटी धावा करण्याचा विक्रम नोंदवला गेला. तो मायदेशात सर्वाधिक धावा करणारा पाचवा भारतीय खेळाडू ठरला. याबाबतीत अव्वलस्थानी सचिन तेंडुलकर असून त्याने भारतात कसोटी कारकीर्दीत 7216 धावा केल्या आहेत. यानंतर राहुल द्रविड (5598), सुनील गावसकर (5067) आणि वीरेंद्र सेहवाग (4656) यांचा क्रमांक लागतो.
भारत 191 धावांनी मागे
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावांचा डोंगर उभारला होता. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 3 विकेट्स गमावत 289 धावा केल्या. सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलियापेक्षा 191 धावांनी मागे आहे. भारतासाठी शुबमन गिल (Shubman Gill) याने 128 धावांची तडाखेबंद खेळी साकारली. तसेच, विराट कोहली 59 आणि रवींद्र जडेजा 16 धावांवर नाबाद आहेत. (ind vs aus captain steve smith just checking king virat kohli bat during drinks break)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वन वुमन शो! 10 चौकार आणि 5 षटकारांसह शफालीने मैदानावर आणले वादळ
मारिजेन कॅप बनली डब्ल्यूपीएलमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करणारी गोलंदाज, मोडला सहकारी खेळाडूचा विक्रम