(Rohit Sharma Champions Trophy 2025) रोहित शर्मा जरी मोठ्या धावसंख्येच्या खेळीत चमकत नसला, तरी त्याची फलंदाजी करण्याची शैली निश्चितच प्रशंसनीय आहे. त्याच्या आक्रमक आणि आत्मविश्वासपूर्ण खेळाचा ड्रेसिंग रूमवर सकारात्मक परिणाम होत आहे. याच मुद्द्यावर भर देत भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने रोहितचे समर्थन केले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडिया विजयी लय कायम राखत आहे. आतापर्यंत भारताने सलग चार सामने जिंकले असले, तरी रोहितला मोठी खेळी साकारता आलेली नाही. त्यामुळे टीकाकार त्याच्यावर सतत निशाणा साधत आहेत. मात्र, गौतम गंभीरने स्पष्टपणे सांगितले आहे की, कर्णधार म्हणून रोहितची भूमिका केवळ धावा करण्यापुरती मर्यादित नाही, तर तो संपूर्ण संघावर सकारात्मक प्रभाव पडतो. (Gautam Gambhir on Rohit Sharma)
(Gautam Gambhir press conference Champions Trophy) चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. यानंतर, टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने पत्रकार परिषदेत हजेरी लावली. यादरम्यान गौतम गंभीरला विचारण्यात आले की चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 4 सामन्यांमध्ये रोहित शर्माने 26 च्या सरासरीने 104 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये सर्वोच्च धावसंख्या 41 धावा आहे. (Rohit Sharma performance analysis)
या प्रश्नावर उत्तर देताना गौतम गंभीर म्हणाला की, चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला जाणार आहे हे तुम्ही विसरू नका. त्याआधी मी तुम्हाला काय उत्तर देऊ? तो म्हणाला की, रोहित शर्माने कर्णधार म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. तुम्ही रोहित शर्माच्या कामगिरीचे मूल्यांकन धावांवरून करत आहात, पण रोहित शर्माचा प्रभाव तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे.
पुढे गौतम गंभीर म्हणाला की, रोहित शर्मा ज्या पद्धतीने कोणतीही चिंता न करता फलंदाजी करत आहे, त्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये एक चांगला संदेश जातो. तुम्ही रोहित शर्माच्या कामगिरीचे मूल्यांकन धावांवरून करत आहात, पण आम्ही त्याच्या प्रभावाकडे पाहतो. यानंतर गौतम गंभीर म्हणाला की, पत्रकार आणि तज्ज्ञ असल्याने तुम्ही आकडेवारीच्या खेळात अडकू शकता, परंतु प्रशिक्षक म्हणून मी आकडेवारीपेक्षा निकालाला प्राधान्य देईन. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. पण आतापर्यंत रोहित शर्माची बॅट शांत राहिली आहे. तथापि, भारतीय चाहत्यांना आशा आहे की रोहित शर्मा निश्चितच अंतिम फेरीत चांगली कामगिरी करेल.
हेही वाचा-
रोहित शर्माचा ऐतिहासिक विश्वविक्रम, असा पराक्रम करणारा तो जगातील एकमेव कर्णधार!
‘चेस मास्टर’ विराट कोहलीचा जलवा! ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 विक्रम रचत इतिहास घडवला
पीसीबीच्या आशा धुळीस, चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना पाकिस्तानमध्ये नाही, टीम इंडियाचा दणका.!!






