भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियात मागील दोन बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकल्या आहेत. त्या दोन्ही मालिकांमध्ये चेतेश्वर पुजाराने भारतासाठी शानदार कामगिरी केली होती. चेतेश्वर पुजारा 2024-25 बीजीटीसाठी संघाचा भाग नसला तरी तो बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीशी संबंधित आहे. यावेळी तो क्रिकेटर नाही तर समालोचक म्हणून दिसणार आहे. यापूर्वी चेतेश्वर पुजाराने भविष्यवाणी केली होती आणि सांगितले होते की यावेळी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कोण जिंकू शकेल? भारत मालिका जिंकेल असे माझे मन म्हणत असल्याचे तो म्हणाला, पण यावेळी ऑस्ट्रेलियाचा दबदबा असल्याचेही त्याने कबूल केले.
चेतेश्वर पुजाराने स्टार स्पोर्ट्सच्या प्रेस रुममध्ये माध्यमांशी संवाद साधताना म्हणाला की, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात गेल्या दोन मालिका जिंकल्या असल्या तरी यावेळी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाचा दबदबा आहे. पुढे तो म्हणाला, “टीम इंडिया ही मालिका जिंकेल, असे माझे मन सांगते. परंतु आपल्याला हेही मान्य करावे लागेल की यावेळी ऑस्ट्रेलिया पुढे आहे. आकडेवारी आणि सद्य परिस्थिती पाहिली तरी परिस्थिती त्यांच्या बाजूने झुकलेले दिसते. त्यांच्याकडे अनुभवी फलंदाज आहेत जे की भारताकडे ते नाही.”
वास्तविक पाहिले तर पुजाराचे म्हणणे बरोबर आहे. कारण भारतीय संघाने नुकतीच घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका 3-0 ने गमावली. याशिवाय कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि मधल्या फळीतील फलंदाज फॉर्मात नाहीत. संघात जसप्रीत बुमराहशिवाय गोलंदाजीत दुसरा अनुभवी वेगवान गोलंदाज नाही. यासोबतच फिरकीपटूंना खेळवायचे तर कोणाला संघात स्थान द्यावे, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.
जर दुसरीकडे आपण ऑस्ट्रेलियन संघाबद्दल बोललो तर त्यांच्या तीन वेगवान गोलंदाजांनी 900 बळी घेतले आहेत (जॉश हेझलवूड, मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स), तर भारताचे संपूर्ण वेगवान आक्रमण एकूण 300 विकेट देखील घेऊ शकले नाही. मात्र, हेही विसरता कामा नये की, येथे भारताने शेवटची मालिका जिंकली होती.
हेही वाचा-
‘मला जबाबदाऱ्या आणि आव्हाने…’, जसप्रीत बुमराहचे पर्थ कसोटीपूर्वी कर्णधारपदाबाबत मोठे वक्तव्य
IND vs AUS: टीम इंडियाची प्लेइंग 11 ठरली, कर्णधार जसप्रीत बुमराहने केला मोठा खुलासा
भारतीय कसोटी इतिहासात घडणार मोठा चमत्कार, जयस्वाल मोडणार सर्वात मोठा विक्रम