सध्या भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर आहे. आणि उभय संघात कोणताही वाद नाही. असे होऊ शकत नाही. ज्याच्या प्रत्यय मालिकेतील दोन्ही सामन्यात आले आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बाॅर्डर गावस्कर मालिकेतील पहिल्या कसोटीच्या पर्थ सामन्यातही पंचांच्या निर्णयावरून गदारोळ झाला होता. आता ॲडलेड कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही हाच प्रकार पाहायला मिळाला.
ऑस्ट्रेलियाच्या डावात 58व्या षटकात अश्विन गोलंदाजीला आला. ज्यातील तिसरा चेंडू अश्विनने मिचेल मार्शला टाकला. तो चेंडू मार्शला पुढे जाऊन ऑफ स्टंपमधून येणारा लेन्थ चेंडू गोलंदाजाच्या दिशेने खेळायचा होता. पण येणाऱ्या चेंडूवर त्याची लाईन चुकली. चेंडू पायाला लागला. त्यानंतर गोलंदाज आणि खेळाडूंनी एलबीडब्ल्यू आऊटचे आवाहन केले. पंचांनी अपील फेटाळले.
रोहितने पुन्हा खेळाडूंशी चर्चा केली आणि त्यानंतर डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. थर्ड अंपायरने रिप्ले पाहिला पण तो योग्य निर्णय घेऊ शकला नाही. असे थर्ड अंपायर म्हणाले की, मिळालेल्या व्हिज्युअल मध्ये चेंडू पॅडला लागला की बॅटला हे स्पष्ट दिसत नाहीये. त्यामुळे अशा परिस्थितीत निर्णय फलंदाजाच्या बाजूने जाईल. त्यामुळे मार्श नाबाद राहिला.
3rd umpire says there’s no conclusive evidence to overturn the decision. pic.twitter.com/pY8GjxhthI
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 7, 2024
दुसरीकडे, वारंवार टीव्ही रिप्ले पाहिल्यानंतर, चेंडू आधी पॅडला आणि नंतर बॅटला लागल्याचे दिसून आले. मात्र तिसऱ्या पंचाचा गोंधळ का झाला हे कोणालाच समजले नाही. भारतीय खेळाडूंनी या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले.
अंपायच्या या निर्णयावर चाहते सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत आणि नाराजी व्यक्त करत आहेत. टीव्ही रिप्ले पाहूनही थर्ड अंपायरला पुरावे का सापडले नाहीत यावर लोकांचा विश्वास बसत नाहीये.
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, ऑस्ट्रेलियन संघाने सध्या 11 धावांची आघाडी घेतली असून अद्याप त्यांच्या 6 विकेट शिल्लक आहेत. दिवस-रात्र कसोटी सामन्यात पहिल्या डावात भारताला 180 धावांत गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या दिवशी चहापानाच्या विश्रांतीपर्यंत 4 विकेट गमावून 191 धावा केल्या आहेत.
हेही वाचा-
ENG vs NZ; 3 वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमधील हॅट्रिकचा दुष्काळ संपला, इंग्लंड गोलंदाजाने रचला इतिहास
IND VS AUS; ट्रेव्हिस हेडचं अर्धशतक ऑस्ट्रेलिया 11 धावांनी आघाडीवर, टीम इंडिया अडचणीत!
आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणारे टाॅप-5 खेळाडू






