नागपूर येथे झालेल्या टी20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा (INDvsAUS) 6 विकेट्सने पराभव केला आहे. शुक्रवारी (23 सप्टेंबर) झालेल्या या दुसऱ्या टी20 सामन्यातील विजयासह भारताने तीन सामन्यांंच्या टी20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. या सामन्यात विकेटकीपर दिनेश कार्तिक याने शेवटच्या षटकात चौकार, षटकार मारत संघाला सामना जिंकून दिला. या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मा याने कार्तिकऐवजी रिषभ पंत फलंदाजीला येणार होता, असा चकीत करणारा खुलासा केला आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) याने या सामन्यानंतर म्हटले, “आम्ही रिषभ पंतला पाठवण्याचा विचार करत होतो, मात्र मला वाटले सॅम्स शेवटचे षटक टाकणार. तो ऑफ कटरची गोलंदाजी करतो. यासाठी मी डिकेला (दिनेश कार्तिक) बोलावले. कारण तो मागील सामन्यांमध्ये आमच्यासाठी फिनिशर म्हणून चांगली भुमिका पार पाडत आहे.”
दुसऱ्या टी20 सामन्यात रिषभ पंत (Rishabh Pant) याला देखील अंतिम अकरामध्ये निवडले गेले. तर भारत जेव्हा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा रोहितने चांगली फलंदाजी केली. भारताला सामना जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात नऊ धावांची आवश्यकता होती, तेव्हा पंत नाहीतर दिनेश कार्तिक फलंदाजीला आला. तेव्हा त्याने डॅनियल सॅम्स याच्या गोलंदाजीच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला आणि पुढच्याच चेंडूवर चौकार मारला. अशाप्रकारे कार्तिकने दोन चेंडूवर 10 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. तर दुसऱ्या बाजूला रोहित होता. त्याने या सामन्यात नाबाद 46 धावा केल्या.
Captain @ImRo45's reaction ☺️
Crowd's joy 👏@DineshKarthik's grin 👍
🎥 Relive the mood as #TeamIndia sealed a series-levelling win in Nagpur 🔽 #INDvAUS | @mastercardindia
Scorecard ▶️ https://t.co/LyNJTtl5L3 pic.twitter.com/bkiJmUCSeu
— BCCI (@BCCI) September 23, 2022
या मालिकेतील तिसरा सामना रविवारी (25 सप्टेंबर) हैद्राबाद येथे खेळला जाणार आहे. मालिका विजयाच्या दृष्टीने दोन्ही संघासाठी हा सामना महत्वाचा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटच्या एका इशाऱ्यावर नागपूर स्टेडियम ‘गप-गार’, चाहत्यांच्या ‘या’ कृत्यामुळे भडकला माजी कर्णधार
आंतरराष्ट्रीय टी20मध्ये कॅप्टन रोहितची दहशत! केला ‘हा’ ऐतिहासिक पराक्रम नावावर
ज्युनियर तेंडुलकर झाला 23 वर्षांचा; जाणून घ्या बर्थ डे बॉयच्या आयुष्यातील मजेशीर किस्से