---Advertisement---

“भारताचा मेलबर्नमधील विजय १९८३च्या विश्वचषक जिंकण्यासमान”, पाहा कोणी केलीये ही तुलना

On: शुक्रवार, जानेवारी 1, 2021 8:39 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधे चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने गमावला होता. मात्र दुसर्‍या सामन्यात भारतीय संघाने विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली दमदार पुनरागमन करताना विजय मिळवला. या विजयानंतर भारताचे माजी खेळाडू फारूख इंजिनियर खूप खुश झाले आहेत. त्यांनी या विजयाची तुलना 1983 विश्वचषका सोबत केली आहे.

एका वेबसाईटला मुलाखत देताना फारूख इंजिनियर म्हणाले, “हे खूपच शानदार पुनरागमन आहे. हे भारतासाठी विश्वचषक जिंकल्या प्रमाणे आहे. हा विजय 1971 साली कसोटी विजया प्रमाणे आहे. ज्याचे पूर्ण श्रेय भागवत चंद्रशेखर यांना होते.”

साल 1961 ते 1975 यादरम्यान भारतीय संघासाठी 46 कसोटी सामने खेळलेल्या या दिग्गजाने विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व करणार्‍या अजिंक्य रहाणेचे तोंडभरून कौतुक केले. मेलबर्न कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 12 वे शतक ठोकले. त्याच्या या जबरदस्त खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

फारूख इंजिनियर म्हणाले, “आपल्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध धमाकेदार पुनरागमन केले. अजिंक्य रहाणे आणि त्याच्या पूर्ण संघाला सलाम. अजिंक्य रहाणेने पुढे जाऊन नेतृत्व केले. आणि त्याने करून दाखवले. हे जर मी करू शकतो तर तुमच्या सर्वांमध्ये हे करून दाखवण्याची क्षमता आहे. तो मुंबईच्या शिवाजी पार्क मध्ये खेळून मोठा झाला आहे. त्याचबरोबर तो एक योद्धा आहे. मी त्याला नेहमी एका लढवय्या प्रमाणे पाहिले आहे. भारतीय संघाचा हा विजय खूपच दमदार होता.”

मागील सामन्याबद्दल बोलताना फारूख म्हणाले, “हो, आपण 36 धावांवर सर्वबाद झालो. ऑस्ट्रेलिया गोलंदाजांनी एकदम अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली होती. त्याचबरोबर ते आपल्या फलंदाजांनी चूक करण्याची वाट बघत होते. आपण सगळ्यानी पुन्हा पुन्हा एकच चूक केली. आपण चेंडूच्या मागे येण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र ते आपण या सामन्यात केले आणि विजय मिळवला.”

या मालिकेतील तिसरा सामना आता सिडनीच्या मैदानावर खेळविण्यात येईल. ७ जानेवारीपासून या सामन्याला सुरुवात होईल.

महत्वाच्या बातम्या:

डोंबिवली- बोरीवलीकडे टीम इंडियाची धुरा, मुंबईकर रहाणे कर्णधार तर रोहित उपकर्णधार

जेव्हा ब्रायन लाराला स्लेजिंग करणे ऑस्ट्रेलियाला पडले महागात, वाचा खुद्द पॉंटिंगने सांगितलेला किस्सा

व्हिडिओ: सराव सामन्यात दिसली आक्रमक श्रीसंतची झलक! तिखट मारा करत फलंदाजांना केले स्लेजिंग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---