आज ICC अंडर-19 विश्वचषकाचा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. विलोमूर पार्क, बेनोनी येथे भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता हा सामना दोन्ही संघांमध्ये सुरू होणार आहेत. तर भारताने पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव करत अंतिम फेरीतील आपले तिकीट निश्चित केले आहे.
याबरोबरच, या महाअंतिम सामन्यामध्ये 1 वाजता टॉस उडवण्यात आला आहे. तर नाणेफेकीचा कौल हा ऑस्ट्रेलियाच्या बाजूने गेला असून कॅप्टन ह्यू वेबगेन याने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर या महामुकाबल्यासाठी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी आपल्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. ऑस्ट्रेलियाने आपल्या त्याच खेळाडूंवर विश्वास दाखवलाय. तर टीम इंडियाच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल होणार असल्याची चर्चा होती.
ICC अंडर-19 विश्वचषकात दोन्ही संघांनी आपल्या खेळाने छाप पाडली आहे. अंडर-19 विश्वचषकात भारत हा सर्वाधिक वेळा चॅम्पियन ठरलेला संघ आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाच्या रेकॉर्डबद्दल बोलायचे तर भारतीय संघ कायमच वरचढ राहिला आहे. तसेच, अंडर-19 विश्वचषकाचा अंतिम सामना उभय संघांमध्ये तिसऱ्यांदा खेळवला जाणार आहे.
याआधी २०१२ आणि २०१८ मध्ये दोन्ही संघ विजेतेपदासाठी मैदानात उतरले होते आणि दोन्ही वेळा भारत चॅम्पियन बनला होता. आता कांगारू संघाविरुद्ध जेतेपदाची हॅट्ट्रिक साधण्याची संधी भारताकडे आहे. तर अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यांसाठी दक्षिण अफ्रिकेतील विलोमूरे पार्क मैदानात वेगवान गोलंदाजांना मदत करणार आहे. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. रविवारी झालेल्या सामन्यातही कमी स्कोअर पाहायला मिळाला होता. तर या मैदानात आतापर्यंत 27 एकदिवसीय सामने झाले आहेत. त्यात पहिल्यांदा गोलंदाजी घेणारा संघ 17, तर 8 सामन्यात दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे.
दरम्यान, हवामानाच्या अंदाजानुसार, या ठिकाणी पाऊस पडण्याची 40 टक्के शक्यता आहे. त्यामुळे सामन्यात काही ठरावीक कालावधी पावसाचा व्यत्यय येईल. कमाल तापमान 23 आणि किमान तापमान 15 डिग्री असेल. तसेच हवामानातील आर्द्रता ही 69 टक्के असणार आहे.
अंतिम फेरीसाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ
भारतीय संघ :-आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (यष्टीरक्षक), मुरुगन अभिषेक, नमन तिवारी, राज लिंबानी, सौम्य पांडे.
ऑस्ट्रेलिया संघ :- ऑस्ट्रेलिया: हॅरी डिक्सन, सॅम कोन्स्टास, ह्यू वेबगेन (कर्णधार), हरजस सिंग, रायन हिक्स (यष्टीरक्षक), ऑलिव्हर पीक, चार्ली अँडरसन, राफ मॅकमिलन, टॉम स्ट्रेकर, महली बियर्डमन, कॅलम विडलर.
महत्वाच्या बातम्या –
SA20 2024 Final : परदेशात काव्या मारनच्या सनरायझर्सने फडकावला झेंडा! सलग दुसऱ्यांदा जिंकले विजेतेपद
Prithvi Shaw : शतक ठोकल्यानंतर पृथ्वी शॉचे धक्कादायक वक्तव्य ; म्हणाला ‘टीम इंडियात…