गेल्या काही वर्षांपासून संघाबाहेर असलेला युवा फलंदाज पृथ्वी शॉ बऱ्याच दिवसांपासून दुखापतग्रस्त होता. तसेच रणजी ट्रॉफीच्या संपूर्ण मोसमातून तो बाहेर पडेल असे सर्वांना वाटत होते. पण त्याला खेळण्याची संधी मिळताच त्याने शतक पूर्ण करत जोरदार कमबॅक केलं आहे.
रणजी ट्रॉफीच्या मुंबई विरुद्ध छत्तीसगड यांच्यातील सामन्यात 185 चेंडूंचा सामना करत 159 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 18 चौकार आणि 3 षटकार मारले आहेत. या खेळीदरम्यान त्याने भूपेनसोबत मिळून 244 धावा जोडल्या होत्या.
याबरोबरच, या दमदार खेळी नंतर युवा फलंदाज पृथ्वी शॉने एक मोठे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला आहे की, सध्या मी भारतीय संघात पुनरागमन करण्यावर लक्ष केंद्रित करत नाही. त्याच्या या वक्तव्याने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. तसेच येत्या काही दिवसात आयपीएल 2024 ला सुरूवात देखील होणार आहे. यामुळे पृथ्वी शॉ फॉर्ममध्ये येणं ही दिल्ली कॅपिटल्स संघासाठी आनंदाची बाब आहे. तर गेल्या हंगामात त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती.
तसेच, आयपीएल 2024 मध्ये संघाचा कर्णधार रिषभ पंत खेळणार की नाही हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. त्यामुळे पृथ्वी शॉ दिल्ली कॅपिटल्स संघासाठी गेम चेंजर ठरु शकतो. याबरोबरच, पृथ्वी शॉ आयपीएलमध्ये आक्रमक शैलीने फलंदाजी करतो. त्याने जर संघाला चांगली सुरुवात करुन दिली, तर विरोधी संघातील गोलंदाजांना सामन्यात कमबॅक करणं कठीण जाणार आहे.
दरम्यान, पृथ्वी शॉ ने 2019 मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केलं होतं. त्याने वेस्टइंडिजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावलं आहे.त्यावेळी त्याला भविष्यातील सचिन तेंडुलकर म्हटलं जात होतं. मात्र त्यानंतर त्याच्या खराब फॉर्ममुळे त्याला संघाबाहेर राहावं लागलं होतं. तो 2021 मध्ये आपला शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. त्याला भारतीय संघासाठी 5 कसोटी, 6 वनडे आणि 1 टी-20 सामना खेळण्याची संधी मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या –
IND vs AUS FINAL : अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना कुठे आणि केव्हा पाहता येणार; वाचा सविस्तर
दुसऱ्या कमिशनर्स प्रौढ करंडक क्रिकेट स्पर्धेत जीएसटी जायंटस, रेल्वे वॉरियर्स संघांची आगेकूच