---Advertisement---

IND vs AUS FINAL : अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना कुठे आणि केव्हा पाहता येणार; वाचा सविस्तर

On: रविवार, फेब्रुवारी 11, 2024 11:02 AM
---Advertisement---

आज खरंतर अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तर भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ अंतिम सामन्यात आमनेसामने आले आहेत. याबरोबरच, अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही संघांची स्पर्धेतील कामगिरी जबरदस्त राहिली आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. चला तर मग अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना कुठे आणि कधी पाहता येईल ते जाणून घेऊयात…

अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना हा दक्षिण अफ्रिकेतील बेनोनी येथील विलोमूरे पार्क मैदानात हा सामना रंगणार आहे. उपांत्य फेरीत भारताने दक्षिण अफ्रिकेचा, तर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानाचा पराभव केला आहे. उपांत्य फेरीचे दोन्ही सामने अतितटीचे राहिले. त्यामुळे अंतिम फेरीचा सामन्यातही असंच काहीसं पाहायला मिळू शकते.

याबरोबरच, भारतीय संघाने साखळी फेरीत बांगलादेश, आयर्लंड, नेपाळ या संघांना पराभूत केलं. तर सुपर सिक्समध्ये युएसए आणि न्यूझीलंडचा पराभव केला आहे. तर दुसरीकडे विलोमूरेची खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांना मदत करणारी आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजीवर बरंच काही अवलंबून असणार आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं जाईल. तर, मागच्या पाच सामन्यात या खेळपट्टीवर धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे.

दरम्यान, अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना दुपारी 1:30 वाजता सुरू होणार आहे. तर बेनोनी येथील सहारा पार्क विलोमूर क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेची अंतिम लढत होणार आहे. याबरोबरच, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंडर 19 वर्ल्डकप फायनलचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण पाहता येईल. तसेच हॉटस्टारवर लाईव्ह पाहता येणार आहे.

अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत अंडर 19: आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी आणि सौम्य पांडे.

ऑस्ट्रेलिया अंडर 19: हॅरी डिक्सन, सॅम कोन्स्टास, ह्यू वेबगेन (कर्णधार), हरजस सिंग, रायन हिक्स (विकेटकीपर), टॉम कॅम्पबेल, ऑलिव्हर पीक, राफ मॅकमिलन, टॉम स्ट्रेकर, महली बियर्डमन आणि कॅलम विडलर.

महत्वाच्या बातम्या –

दुसऱ्या कमिशनर्स प्रौढ करंडक क्रिकेट स्पर्धेत जीएसटी जायंटस, रेल्वे वॉरियर्स संघांची आगेकूच 

यश क्रीडा मंडळ द्वितीय, तर रण झुंजार मंडळ तृतीय श्रेणीत अंतिम विजेते ठरले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---