बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 ची सुरुवात विजयाने केली असली तरी टीम इंडिया चार सामन्यांनंतर पाच सामन्यांच्या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. मेलबर्नमध्ये पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाने भारताचा दुसरा डाव अवघ्या तीन सत्रात गुंडाळला आणि 184 धावांनी विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली. या दरम्यान भारताचे अनेक फलंदाज खराब फटके खेळून बाद झाले आणि संघाने अवघ्या 20.4 षटकांत 7 विकेट गमावल्या. या सामन्यात भारतीय संघाला ज्या पद्धतीने पराभवाचा सामना करावा लागला त्यावर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर खूश नाही. सोमवारी त्यांनी अस्वस्थ ड्रेसिंग रुमसाठी संपूर्ण संघाला फटकारले आहे.
इंडियन एक्सप्रेसने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, गौतम गंभीरने संपूर्ण संघाला फटकारले आहे. त्याने कोणत्याही खेळाडूचे नाव घेतले नसले तरी नैसर्गिक खेळ आणि परिस्थितीनुसार खेळ न करण्याच्या खेळाडूंच्या वृत्तीवर तो खूश दिसत नव्हता. गेल्या सहा महिन्यांत त्याने संघाला हवे ते करू दिले. याबद्दल गंभीर म्हणाला, पण आता संघाला कसे खेळायचे आहे हे तो स्वत: ‘निर्णय’ घेणार असल्याचेही कळते आहे. जो खेळाडू त्याच्या पूर्वनिश्चित रणनीतीचे पालन करणार नाही त्याला वगळण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे.
भारताने गेल्या काही वर्षांत ऑस्ट्रेलियाला बीजीटीमध्ये यशस्वी होऊ दिलेले नाही. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात दोनदा झेंडा फडकवला आहे. पण यावेळी सिडनी कसोटी हरल्यास मालिका पराभवामुळे ट्रॉफी गमवावी लागेल. अशा परिस्थितीत गौतम गंभीरला मालिकेत पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाच्या पुनरागमनासाठी योजना तयार करावी लागेल. जेणेकरून पाचवा सामना जिंकून मालिका 2-2 अशी संपुष्टात आणता येईल.
🚨 GAUTAM GAMBHIR IS NOT HAPPY WITH TEAM INDIA’S PLAYERS 🚨
– Gautam Gambhir is not happy with how the players were doing their own thing in the name of “Natural Game”, instead of playing according to the situation. Gambhir said “Bahut Ho Gaya” in his speech. (Express Sports). pic.twitter.com/sv8gnelJyz
— Tanuj Singh (@ImTanujSingh) January 1, 2025
हेही वाचा-
AUS दौऱ्यानंतर रोहित शर्मा आणि गौतम गंभीर बीसीसीआयच्या रडारावर, अहवालात मोठा खुलासा
2024 मध्ये, फक्त एका भारतीय फलंदाजाने कसोटीत द्विशतक झळकावले, संघासाठी केल्या सर्वाधिक धावा
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवडली वर्षातील सर्वोत्तम टेस्ट प्लेइंग 11, केवळ 2 भारतीयांचा समावेश