---Advertisement---

IND VS AUS; “गुडनाईट रोहित शर्मा…”, ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूने हिटमॅनला डिवचले

On: शुक्रवार, डिसेंबर 6, 2024 3:09 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना हा ॲडलेड ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. या दिवस-रात्र कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्माचे पुनरागमन झाले आहे. सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघासाठी रोहित डावाची सुरुवात करण्यासाठी आला नाही. केएल राहुलने यशस्वी जयस्वालसह डावाची सुरुवात केली.

रोहित शर्मा जवळपास सहा वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. ज्यात त्याने 23 चेंडू खेळत तीन धावा करून बाद झाला. रोहित शर्माने सामन्याच्या एक दिवस आधी स्पष्ट केले होते की केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल डावाची सुरुवात करतील आणि तो मधल्या फळीत फलंदाजी करेल. ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज ॲडम गिलख्रिस्टने बाद झाल्यानंतर रोहितच्या जखमेवर मिरची चोळली. रोहितचे फूटवर्क काही खास नव्हते आणि गिलख्रिस्टने लाइव्ह कॉमेंट्री दरम्यान त्याची चर्चाही केली होती.

कॉमेंट्रीदरम्यान ऍडम गिलख्रिस्ट म्हणाला, ‘पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियासाठी हॅझलवूड सर्वोत्तम गोलंदाज ठरला होता. पण त्याच्या जागी स्कॉट बोलंडही तसा वाईट नाही. बोलंड उंच आहे. पण हेजलवूड असता तर कदाचित हा चेंडू स्टंपला लागला नसता. बोलंडला चेंडू कसा स्किड करायचा हे माहीत आहे. इथेही असंच काहीसं घडलं आणि रोहित शर्माचा पुढचा पाय अडकला, त्याच्यासाठी हा शुभ रात्री…’

ॲडलेड कसोटीची सुरुवात भारताची चांगली झाली नाही. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर यशस्वी जयस्वाल गोल्डन डकवर बाद झाला आणि मिचेल स्टार्कने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. ॲडलेड कसोटीत भारताने पहिल्या डावात 180 धावा केल्या. ज्यात नितीश कुमार रेड्डीने सर्वाधिक 42 धावा केल्या. तर गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. त्याच्या व्यतीरिक्त स्काॅट बोलंड आणि कर्णधार पॅट कमिन्सने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.

हेही वाचा-

भारताचा पहिला डाव 200च्या आत आटोपला; स्टार्कचा कहर, युवा नितीशचा एकाकी लढा
केएल राहुल आऊट न होताच माघारी परतत होता, अंपायरनं अशाप्रकारे दिला दुसरा चान्स
स्टार गोलंदाजाची दुसऱ्या कसोटीत उत्कृष्ट कामगिरी, या यादीत तिसऱ्या स्थानी झेप!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---