टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. मात्र, या मालिकेतील स्कोअरलाइन सध्या ऑस्ट्रेलियाच्या बाजूने 2-1 अशी आहे. जसप्रीत बुमराहने या मालिकेत चांगली कामगिरी केली नसती तर ऑस्ट्रेलियन संघाने ही मालिका आतापर्यंत जिंकली असती. ऑस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा यानेही असेच म्हटले आहे. तो म्हणाला की जसप्रीत बुमराहने ही मालिका पूर्णपणे असंतुलित होण्यापासून वाचवली आहे.
माजी वेगवान गोलंदाज मॅकग्राने भारतीय गोलंदाजाचे चेंडूवरील नियंत्रण आणि पटकन जुळवून घेण्याच्या क्षमतेचे कौतुक केले. पाच सामन्यातील शेवटचा सामना 3 जानेवारीपासून सुरु होईल. मालिकेत भारत 1-2 ने पिछाडीवर आहे. बुमराहने आतापर्यंत 20 पेक्षा कमी सरासरीने 30 बळी घेत भारतासाठी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. मात्र, भारताची फलंदाजी खराब आणि नियोजनाचा अभाव आहे. यामुळेच आज भारतीय संघ या मालिकेत पिछाडीवर आहे.
Glenn McGrath said “I am a big fan of Jasprit Bumrah, he has been a massive part of the Indian Team and without Bumrah, this Test series might have been one sided, What he does is special”. [TOI] pic.twitter.com/qiCS47INms
— Johns. (@CricCrazyJohns) January 1, 2025
मॅकग्रा त्याच्या फाउंडेशनच्या कर्करोग जागरूकता कार्यक्रमाच्या वेळी प्रसारमाध्यमांशी बुमराहबाबत बोलताना म्हणाला. “तो भारतीय संघाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्याशिवाय मालिका एकतर्फी होऊ शकली असती आणि त्याने जे केले ते विशेष आहे,” 54 वर्षीय मॅकग्रा हा त्याच्या काळातील सर्वात सातत्यपूर्ण आणि धोकादायक वेगवान गोलंदाजांपैकी एक होता. 2008 मध्ये त्यांची पत्नी जेन हिला या आजाराने गमावल्यापासून ते कर्करोग जनजागृती कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी झाले आहेत. बुमराहच्या कौशल्याने मॅकग्राही प्रभावित झाला आहे.
तो पुढे म्हणाला, “जसप्रीत बुमराहने परिस्थितीशी जुळवून घेण्याचा मार्ग शोधला आहे. शेवटच्या काही टप्प्यात तो ज्या पद्धतीने गोलंदाजी करत आहे ते अविश्वसनीय आहे, तसेच मी देखील जसप्रीत बुमरहाचा मोठा चाहता आहे.”
हेही वाचा-
जसप्रीत बुमराह सिडनीत इतिहास रचणार? हरभजन सिंगचा हा महान विक्रम मोडण्याची शक्यता
एमएस धोनीने गोव्यात साजरे केले नवीन वर्ष, पाहा VIDEO
ind vs aus; टीम इंडियात सर्व काही ठीक नाही, कोच गंभीरच्या बोलण्याकडे खेळाडूंचा दुर्लक्ष?