---Advertisement---

मेलबर्न येथे होणारे भारतीय संघाचे सराव सत्र ‘या’ कारणामुळे झाले रद्द 

On: रविवार, जानेवारी 3, 2021 5:50 PM
---Advertisement---

सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही चार सामन्यांची कसोटी मालिका भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळली जात आहे. या मालिकेतील दोन सामने खेळले गेले आहेत. दोन्ही संघाने प्रत्येकी एक विजय मिळवला आहे. त्यामुळे दोन्ही संघ बरोबरीत आहेत. तिसरा कसोटी सामना 7 जानेवारी पासून खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे मेलबर्न येथे सराव सत्राचे आयोजन केले होते. हे सिडनीला जाण्याआधीचे महत्त्वाचे सत्र होते. मात्र त्याठिकाणी खूप पाऊस झाल्याने भारतीय संघाचे सराव रद्द करण्यात आले आहे.

रविवारी(3 जानेवारी) मेलबर्न येथे खूप पाऊस झाल्याने भारतीय संघाचे सराव सत्र रद्द करण्यात आले आहे. बीसीसीआयने याबद्दल माहिती दिली. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ 4 जानेवारीला सिडनीसाठी रवाना होतील.

मेलबर्न येथे ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला होता. या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेने केले होते. या सामन्यात भारतीय संघाने 8 विकेट्सने विजय मिळवला होता. सिडनीत सध्या कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणामुळे दोन्ही संघाना 4 जानेवारी पर्यंत मेलबर्न येथे सराव करायला सांगण्यात आले होते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या पूर्वीच स्पष्ट केले होते की, तिसरा सामना सिडनीत खेळला जाईल.

जैव सुरक्षित वातावरणाच्या नियमांमुळे  झाला होता वाद

शनिवारी भारतीय संघ आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्यात जैव संरक्षिततेच्या कारणावरून वाद झाला होता. भारतीय संघाचे पाच खेळाडू रोहित शर्मा, पृथ्वी शाॅ, नवदीप सैनी, शुबमन गिल आणि रिषभ पंत यांना जैव सुरक्षिततेचे नियम मोडल्याने आयसोलेट करण्यात आले आहे. त्यामुळे बीसीसीआय या प्रकरणाचा तपास करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

संधी सोडायची नाय! सिडनी कसोटीसाठी नटराजन करतोय कसून सराव, पाहा व्हिडिओ 

“त्याचा जन्मच नेतृत्व करण्यासाठी झाला आहे,” पाहा रहाणेबद्दल कोणी केलंय हे भाष्य

ब्रिस्बेनमध्ये नाही खेळायची टीम इंडियाला चौथी कसोटी; ऑसी खेळाडू म्हणाला, “होणार तर तिथेच”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---